"मान्सूनचे केरळमध्ये आगमन", हवामान विभागाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 02:34 PM2021-06-03T14:34:07+5:302021-06-03T15:02:07+5:30

सर्वसाधारणपणे मॉन्सूनचे आगमन १ जून रोजी केरळला होत असते

"Monsoon arrives in Kerala three days delayed", Meteorological Department announces | "मान्सूनचे केरळमध्ये आगमन", हवामान विभागाची घोषणा

"मान्सूनचे केरळमध्ये आगमन", हवामान विभागाची घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्दे मॉन्सूनचे ३१ मे रोजी केरळला आगमन होणार असल्याचे याअगोदर हवामान विभागाने जाहीर केले होते

पुणे : केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन झाल्याचे अखेर हवामान विभागाने गुरुवारी सकाळी जाहीर केले. मॉन्सूनचे ३१ मे रोजी केरळला आगमन होणार असल्याचे याअगोदर हवामान विभागाने जाहीर केले होते. परंतु, आवश्यक निकष पूर्ण न केल्याने तसेच पश्चिमी वार्‍यांचा वेग आणि केरळमध्ये पडणारा पावसात आवश्यक तेवढे सातत्याने नसल्याने गेले २ दिवस मॉन्सूनचे आगमन जाहीर केले नव्हते. 

सर्वसाधारणपणे मॉन्सूनचे आगमन १ जून रोजी केरळला होत असते. गेल्या वर्षी २०२० मध्ये हवामान विभागाने १ जून रोजी मॉन्सून येणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता. प्रत्यक्षात त्याचे ५ जून रोजी केरळला आगमन झाले होते. 

गेल्या पाच वर्षात केरळमध्ये मॉन्सूनचे झालेले आगमन व हवामान विभागाने जाहीर केलेला अंदाज

वर्ष         प्रत्यक्षात दाखल    हवामान विभागाचा अंदाज
२०१६           ८जून                          ७ जून
२०१७           ३० मे                          ३०मे
२०१८           २९ मे                          २९ मे
२०१९           ८ जून                         ६ जून
२०२०           ५ जून                         १ जून
२०२१          ३ जून                          ३१ मे
 

Web Title: "Monsoon arrives in Kerala three days delayed", Meteorological Department announces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.