पुणे : केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन झाल्याचे अखेर हवामान विभागाने गुरुवारी सकाळी जाहीर केले. मॉन्सूनचे ३१ मे रोजी केरळला आगमन होणार असल्याचे याअगोदर हवामान विभागाने जाहीर केले होते. परंतु, आवश्यक निकष पूर्ण न केल्याने तसेच पश्चिमी वार्यांचा वेग आणि केरळमध्ये पडणारा पावसात आवश्यक तेवढे सातत्याने नसल्याने गेले २ दिवस मॉन्सूनचे आगमन जाहीर केले नव्हते.
सर्वसाधारणपणे मॉन्सूनचे आगमन १ जून रोजी केरळला होत असते. गेल्या वर्षी २०२० मध्ये हवामान विभागाने १ जून रोजी मॉन्सून येणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता. प्रत्यक्षात त्याचे ५ जून रोजी केरळला आगमन झाले होते.
गेल्या पाच वर्षात केरळमध्ये मॉन्सूनचे झालेले आगमन व हवामान विभागाने जाहीर केलेला अंदाज
वर्ष प्रत्यक्षात दाखल हवामान विभागाचा अंदाज२०१६ ८जून ७ जून२०१७ ३० मे ३०मे२०१८ २९ मे २९ मे२०१९ ८ जून ६ जून२०२० ५ जून १ जून२०२१ ३ जून ३१ मे