शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
4
Baba Siddiqui : फोन इंटरनेटचा वापर न करता कसा रचला कट?; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचं रहस्य उघड
5
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
6
'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत
7
"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती
8
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
9
"आलियाला कपडे बदलायचे होते अन् क्रू मेंबर..." इम्तियाज अलीचा धक्कादायक खुलासा
10
Sensex-Nifty ग्रीन झोनमध्ये, बँक निफ्टी मजबूत; Adani Ent, Adani Port सह मेटल शेअर्स आपटले 
11
वडिलांनी खरेदी केलेल्या पहिल्या बाइकवर बसला भाईजान! बाप-लेकाचा फोटो पाहून चाहते म्हणतात- "स्वॅग असावा तर असा!"
12
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
13
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
14
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
15
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
16
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
17
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
18
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
19
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
20
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!

Monsoon Update: मॉन्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूरपर्यंत; एक दोन दिवसात उर्वरित महाराष्ट्र व्यापणार

By श्रीकिशन काळे | Published: June 09, 2024 2:36 PM

मॉन्सूनमुळे पुणे जिल्ह्यासह रत्नागिरी, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली

पुणे : नैऋत्य मॉन्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूर, नांदेडपर्यंत पोचली असून, एक-दोन दिवसांत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र तो व्यापणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, राज्यामध्ये काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 

दोन दिवसांपूर्वी मॉन्सून दक्षिण कोकण आणि बारामतीपर्यंत पोचला होता. त्यानंतर शनिवारी (दि.८) माॅन्सूनने विश्रांती घेत आपला मुक्काम तिथेच ठोकला. त्यानंतर रविवारी पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड भागात मजल मारली. पुढील दोन दिवसांमध्ये मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये मॉन्सून जाईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. महाराष्ट्रात माॅन्सून गुरुवारी (दि. ६) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये आला होता. त्यानंतर आता तो मराठवाड्यातील आणि प. महाराष्ट्रातील काही भागात पोचला आहे. खरंतर चार दिवस अगोदरच मॉन्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला. त्यानंतर शनिवारी (दि.८) राज्याच्या आणखी काही भागांत वाटचाल केली.  शनिवारी (दि. ८) मॉन्सूनमुळे रत्नागिरी, सातारा, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. तर पुणे जिल्ह्यासह लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागांत मॉन्सून पोचला. तिथेही काही भागात पाऊस झाला. दरम्यान, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत मोसमी वारे पोहोचलेले आहेत. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने मध्य अरबी समुद्र, मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये मॉन्सून लवकरच प्रवेश करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  

राज्यातील पाऊस 

नांदेड - २०.८ मिमी सांगली - १९.३ मिमी ठाणे - १९.४ मिमी उदगीर - ४७ मिमी सातारा - ६१ मिमी सोलापूर - ११.६ मिमी कोल्हापूर - १६.९ मिमी पुणे - ११७.१ मिमीधाराशिव - ५७.४ मिमीबारामती - ५१.२ मिमीनगर - १९.८ मिमीनागपूर - १९.८ मिमीरत्नागिरी - १०७.४ मिमी

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसmonsoonमोसमी पाऊसMaharashtraमहाराष्ट्रenvironmentपर्यावरणHealthआरोग्यNatureनिसर्ग