शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

आगामी २४ तासात मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मॉन्सूनचे वारे भारतीय उपखंडाच्या दिशेने वेगाने येत असून आगामी २४ तासात मॉन्सून दक्षिण अंदमान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मॉन्सूनचे वारे भारतीय उपखंडाच्या दिशेने वेगाने येत असून आगामी २४ तासात मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि त्याच्या लगतच्या दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता आहे़ याचवेळी उत्तर अंदमान समुद्रा आणि लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात २२ मेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे २४ मे रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तविला आहे.

अंदमान समुद्रात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनच्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

उत्तर अंदमान समुद्र आणि लगतच्या पूर्वमध्ये बंगालच्या उपसागरात येत्या २२ मेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याचे संकेत असून या कमी दाबाच्या क्षेत्राचे २४ मे रोजी चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर ते २६ मे रोजी सकाळी ओडिशा व पश्चिम बंगाल दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.

नैर्ऋत्य उत्तर प्रदेश ते मध्य पूर्व अरबी समुद्रापर्यंत पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणमार्गे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या २४ तासांत गुरुवारी सकाळपर्यंत मुंबई २८.२, नागपूर ३.२, पुणे ७.८, नाशिक १, कोल्हापूर ०.७, रत्नागिरी ९.६, सातारा १.६, पणजी ५५.९ मिमी पावसाची नोंद झाली होती.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात शुक्रवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २१ मे तसेच २३ व २४ मे रोजी वादळी वा-यासह पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात २३ व २४ मे रोजी मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २४ मे रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.