अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, टाव्हरेवाडी या तीन गावांची लोकसंख्या १० ते १२ हजारांपेक्षा अधिक आहे. अद्याप पर्यंत १२५० नागरिकांचे लसीकरण झाले आहे, तर काही नागरिकांनी निरगुडसर, धामणी, अवसरी खुर्द गावात जाऊन लसीकरण केले आहे. एक महिन्यानंतर बुधवारी २०० कोविड लसीचे डोस येणार होते, म्हणून दुसरा कोविड लसीचा डोस घेण्यासाठी अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, टाव्हरेवाडी येथील ज्येष्ठ महिला व पुरुषांनी भल्या पहाटेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासमोर रांगा लावल्या होत्या. सकाळी १० वाजता प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली. प्रथम २०० महिला व पुरुषांना लसीकरणासाठी केंद्रात सोडण्यात आले. लसीकरणाचे नियोजन सरपंच पवन हिले, उपसरपंच सचिन हिंगे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर, स्वप्निल हिंगे, पोलीस पाटील माधुरी जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष सर्जेराव हिंगे, सोसायटीचे चेअरमन श्रीहरी हिंगे, ग्रामसेवक दीपक शिरसाट व तलाठी अतुल विभुते, तसेच आरोग्य कर्मचारी अनिल तोडकर, ज्योती गायकवाड, शुभम रोडे, धनंजय लटपटे, बी. के. पांचाळ यांनी केले.
पोलीस अधिकारी गणपत डावखर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
अवसरी बुद्रुक (ता.आंबेगाव) येथिल प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात २०० ज्येष्ठ नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले या वेळी लसीकरणासाठी गर्दी होऊ नये म्हणून पोलीस बंदोवस्त ठेवण्यात आला होता.