शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडकेंचे स्मारक उपेक्षितच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 2:07 PM

पुणे शहरातील संगम पुलाजवळच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या जुन्या कार्यालयाच्या आवारात हे स्मारक असून सध्या धूळमातीच्या आणि झाडाझुडपांच्या विळख्यात अडकले आहे. या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये सत्र न्यायालय होते.

ठळक मुद्देघाणीचे साम्राज्य : स्मारकामागेच मेट्रो कामगारांसाठी स्वच्छतागृह

लक्ष्मण मोरे - 

पुणे : इंग्रजांविरुद्ध धनगर, कोळी, रामोशी आदी उपेक्षित समाजातील तरुणांना संघठीत करुन स्वातंत्र्याचा सशस्त्र लढा उभारणाºया आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंच्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. उपेक्षेच्या गर्तेत सापडलेल्या या स्मारकाभोवती घाणीचे साम्राज्य पसरले असून मेट्रोच्या कामगारांसाठी या स्मारकाला लागूनच स्वच्छतागृह  तयार करण्यात आली आहेत. देशासाठी तारुण्याची होळी केलेल्या फडकेंच्या स्मारकाच्या नशीबीही काळकोठडीच आल्याचे चित्र याठिकाणी दिसते आहे.

संगम पुलाजवळील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या जुन्या कार्यालयाच्या आवारात हे स्मारक असून सध्या धूळमातीच्या आणि झाडाझुडपांच्या विळख्यात अडकले आहे. या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये सत्र न्यायालय होते. फडकेंनी इंग्रजांविरुद्ध बंडाचे निशान फडकावल्यानंतर इंग्रजांनी त्यांना विजापूरनजीक अटक करून १८७९ साली पुण्यात आणले होते. त्यांच्यावर याच सत्र न्यायालयामध्ये खटला चालविण्यात आला. खटला सुरू असताना सार्वजनिक काका फडकेंचे वकीलपत्र घेण्यासाठी धैर्याने पुढे आले. महादेव चिमाजी आपटेंनी न्यायालयात फडकेंची बाजू बेडरपणे मांडली. त्यांचे सहायक वकील म्हणून चिंतामण पांडुरंग लाटे यांनी न्यायालयात फडकेंचा बचाव केला. खटला सुरु असताना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यावर इंग्रजांनी फडकेंच्या बंडात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला होता.  

खटला सुरु असताना फडकेंना तेथीलच एका खोलीमध्ये डांबण्यात आलेले होते. १७ जुलै १८७९ ते ९ जानेवारी १८८० या कालावधीमध्ये फडके या कोठडीमध्ये होते. जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात झाली. या संपूर्ण लढ्याची साक्षीदार असलेल्या या वास्तूमधील स्मारक मात्र एकाकी उपेक्षा सहन करते आहे.====

याच वास्तूच्या आवारात फडकेंचे स्मारक असावे यासाठी सीआयडीचे तत्कालीन महासंचालक जयंत उमराणीकर यांनी लोकवर्गणी आणि फडके स्नेहवर्धिनी संस्थेच्या अर्थसाहाय्यामधून २१ फेब्रुवारी २००६ रोजी एक देखणं स्मारक उभं केलं. येथे काम करणाºया पोलिसांना प्रेरणा मिळावी, ही वास्तू एका क्रांतिकारकाच्या स्पर्शाने पावन झालेली आहे याची जाणीव कायम राहावी, याकरिता या स्मारकाची निर्मिती करण्यात आली होती.=====

काय आहे या स्मारकामध्ये?1. वासुदेव बळवंत फडकेंच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडींचे चित्रण असलेले म्युरल्स2. फडकेंच्या आयुष्याचे शिल्परुपी चित्रण केले आहे प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांच्या कसबी हातांनी3. स्मारकाच्या घुमटावर पराग घळसासी आणि रामचंद्र खरटमलांनी त्याचे रेखाटन केलेला फडकेंचा अर्धाकृती पुतळा.4. फडकेंना कैद्येत ठेवण्यात आलेली कोठडी, या कोठडीच्या समोर कचरा टाकला जात असून दररोज तो जाळलाही जातो. यामुळे या परिसराला अवकळा आली आहे.===स्मारकाभोवतीचे स्मृती उद्यान झाले गायब स्मारकाभोवती  स्मृती उद्यान उभारण्यात आले होते. हे स्मृती उद्यान नामषेश झाले असून याठिकाणी रानटी गवत वाढले आहे. मेट्रोच्या कामात लागणारे बांधकाम साहित्य याठिकाणी पडलेले असून धुळमातीमुळे स्मारक झाकोळून गेले आहे.====जुन्या सीआयडी कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखा, लोहमार्ग पोलीस आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाची कार्यालये आहेत. याठिकाणी पोलिसांचा दिवसरात्र राबता असतो. पोलिसांना फडकेंच्या स्मारकातून प्रेरणा मिळावी याकरिता हे स्मारक उभारण्यात आले होते. परंतु, पोलिसांचेही याकडे दुर्लक्षच झालेले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो