राज्य उत्पादन विभागाचे कॉन्स्टेबल डी. डी. केकरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सरपंच योगेश पाटे, ग्रामपंचायत सदस्य राजेश बाप्ते, सोसायटी रहिवासी गणेश भोर, रामदास काकडे, योगेश शिंदे, सुरेश पटेल, मुरलीधर येवले, रोहित नांगरे, जनार्धन खिल्लारी, अजीम शेख, शिवाजी बोऱ्हाडे, मनसुख बांगर, भीमाजी घोगरे, मनसुख बांगर, सीमा भोर, ज्योती बाबर, कल्पना शिंगाडे, कमल बाळसराफ, भावना पटेल, पूजा इचके, सपना शेलार, मनीषा कोळेकर, अश्विनी बोऱ्हाडे, वर्षा आल्हाट आदी महिला उपस्थित होत्या.
उत्पादन विभागाच्या कार्यालयात सोमवारी महिलांचा मोर्चा येणार असल्याची माहिती दोन दिवस अगोदर असूनही एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने महिला आक्रमक झाल्या.
यासंदर्भात ग्रामपंचायत नारायणगावचे सरपंच योगेश पाटे म्हणाले की, महामार्गालगत ७५ मीटरपर्यंत बारला परवानगी देऊ नये, असे पत्र १ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत नारायणगावने राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेले असूनही या विभागाने ४ ते ५ जणांना परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना आर्थिक गोलमाल झालेला असल्याचा आरोप पाटे यांनी या वेळी केला आहे. सोसायटीतील रहिवासी यांना त्रास होत असल्याने तो बार राज्य उत्पादन विभाग व जिल्हाधिकारी यांनी कायमस्वरूपी बंद करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाटे यांनी या वेळी दिला.
यासंदर्भात उत्पादन विभागाचे निरीक्षक जी. डी. कुचेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, परमिट बारला कायदेशीर परवानगी दिली आहे. परमिट रूमसाठी ग्रामपंचायतीची परवानगी लागत नाही. नागरिक व सोसायटीमधील रहिवाशी यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना बारचालक व मालक यांना तातडीने दिल्या जातील.
नारायणगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयावर मोर्चा काढून बार व लॉज बंद करण्याची मागणी करताना नारायणगाव येथील सुविधा रेसिडेन्सी हौसिंग सोसायटीमधील महिला व नागरिक.