पुणे : कोरोना संसर्गाचा प्रभाव शहरात मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून मंगळवारी दिवसभरात १ हजार ८६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. मंगळवारी (दि.९) दिवसभरात शहरात ६ हजार ९० संशयितांनी कोरोनाची तपासणी करून घेतली. तपासणीच्या तुलनेत आज सर्वाधिक पॉझिव्हिट रुग्ण आढळून आले असून ही टक्केवारी १७.८३ टक्के इतकी आहे. गेल्या काही महिन्यांतील हा सर्वाधिक पॉझिव्हिटी रेट आहे.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रुग्णसंख्याही सात हजारांच्या पुढे गेली असून आजमितीला कोरोनाचे ७ हजार २० रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ७२३ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून या व्यतिरिक्त ३२१ रुग्ण हे गंभीर आहेत.
शहरात आजपर्यंत १२ लाख ४ हजार ६२६ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून यापैकी २ लाख १० हजार १६९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९८ हजार २४६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी ५ जण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ९०३ जणांचा मृत्यू झाला आहे.