शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

बारामती तालुक्यात बचत गटाच्या माध्यमातून ११ हजारांहून अधिक महिलांच्या हाताला मिळाली कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 7:34 PM

ग्रामीण भागात बचत गट ही एक महिला सबलीकरण,सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची सुप्त चळवळ मानली जाते

अविनाश हुंबरे - सांगवी : बारामती तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात महिला स्वयंसहाय्यता बचत गटामार्फत उभारण्यात आलेल्या लघु उद्योगाच्या माध्यमातून ११ हजार ८० महिला एकत्र येऊन त्यांच्या हाताला कामे मिळू लागली असून आपली आर्थिक उन्नती साधू लागल्या आहेत. हजारो महिला आता एकत्रित येऊन उद्योग व्यवसायातून आर्थिक साक्षरतेच्या दिशेने उभारी घेत असल्याचे समोर आले आहे. 

बारामती तालुक्यात ९९ गावांसह शहरात नोंदणीकृत १ हजार १०८ पेक्षा अधिक महिला स्वयंसहाय्यता बचत गट सुरु आहेत.वर्षभरात १८५ बचत गटांना  सव्वा चार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करून बारामती तालुक्यातील बचत गटाच्या महिलांमध्ये उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन मिळत आहे, तर सध्या तालुक्यात जवळपास ९६ टक्के महिला बचत गटाच्या माध्यामातून उद्योग व्यवसायामुळे  हाताला कामे मिळू लागल्याने सक्षम झाल्या असल्याचे समोर आले आहे.

ग्रामीण भागात बचत गट ही एक महिला सबलीकरण,सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची सुप्त चळवळ मानली जाते. बचत गटामुळे आज कित्येक महिलांना समाजात आत्मसन्मानासह स्वत:चा ठसा उमटवता आला आहे, यामुळे त्या स्वावलंबी बनू लागल्या आहेत. राज्यातील महिलांना बचत गटातून आर्थिक उन्नती जलद गतीने व्हावी, यासाठी ग्रामीण महिला वर्गाला बचत करण्यास प्रवृत्त करून शासनाच्या विविध योजनेद्वारे वित्त सहाय्य व उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने महिला बचत गट वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र, ग्रामीण भागात महिला वर्ग बचत गट स्थापन करत असताना येणाऱ्या अडचणी, उद्योग व्यावसायासाठी लागणारे पुरेपूर प्रशिक्षण, बँक कर्ज, वस्तूंच्या विक्रीसाठी आवश्यक बाजारपेठ,व्यवसायाचे अनुभव यावर प्रकाश टाकण्यासाठी बारामतीच्या प्रेरणा कमलाकर कांबळे यांनी संशोधन करून प्रबंध लिहिला आहे. व्यवसायातून महिलांच्या चांगल्या कामाचा आढावा घेत त्यांना येणाऱ्या समस्या देखील समोर मांडल्या आहेत.

याबाबत त्यांना श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील उद्योजकतेकडे वळलेल्या महिला ‘स्वयंसाह्यता’ बचत गटातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणाचा अभ्यास या त्यांच्या प्रबंधाबाबत कांबळे यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे.  

टॅग्स :BaramatiबारामतीWomenमहिलाbusinessव्यवसाय