पुणे : उन्हाळा आला की ज्याप्रमाणे तापमान वाढतं त्याप्रमाणे गाड्या पेटण्याच्या संख्येत वाढ होत असते. यंदाही या घटना वाढण्यास सुरुवात झाली असून गेल्या दोन महिन्यात गाड्या पेटण्याच्या घटनांचा रौप्यमहोत्सव झाला आहे. गाड्या पेटण्याच्या कारणांमध्ये वाढते तापमान, शॉर्टसर्किटही ही कारणे तर आहेतच. पण सध्या पूर्ववैमनस्य किंवा रागातून वाहने पेटवण्याचे प्रकारही वाढत आहेत. काहीही कारण नसताना दारूच्या नशेतही गाड्या पेटवण्याचे उदाहरणही एकदा घडलेले आहे. मात्र गेल्या काही वर्षात या गाड्या पेटण्याच्या संख्येत वाढ होत असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अनेकदा गाड्या पेटल्यावर नेमकं काय करायचं हे माहिती नसल्याने या धुरात काहींना जीव गमवावा लागला आहे.काही वर्षांपूर्वी नवी पेठ भागात लागलेल्या आगीत धुरामुळे एका व्यक्तीचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटनाही अनेकांना माहिती आहे. याशिवाय विविध कारणांमुळे पीएमपी बसही पेट घेत असतात. उन्हाळ्यात त्याचीही आकडेवारी मोठी असून त्यामुळे पुणेकर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र या सगळ्यात गाड्या पेटवून देणे सर्वाधिक धोकेदायक असून ही विकृती कमी करण्याची गरज आहे असे मत मानसोपचार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
दोन महिन्यात पंचवीसपेक्षा जास्त गाड्यांनी घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 9:00 PM
उन्हाळा आला की गाड्या पेटण्याच्या घटना बऱ्याचवेळा ऐकायला मिळतात. यंदाची फेब्रुवारी २०१८पासूनची आकडेवारी काढली असता पुणे शहरात सुमारे पंचवीसपेक्षा अधिक गाड्यांनी पेट घेतल्याचे समोर आले आहे.
ठळक मुद्देपूर्ववैमनस्यातून गाड्या पेटवण्याच्या प्रमाणात वाढ दोन महिन्यात पंचवीसपेक्षा अधिक वाहनांनी घेतला पेट