पुणे : शहरात बुधवारी ४ हजार ८५७ कोरोनाबाधित आढळून आले असून, १ हजार ८०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २० हजार ८०१ जणांनी कोरोना चाचणी करून घेतली असून, तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी २४.२८ टक्के इतकी आहे. शहरातील सक्रिय रुग्णसंख्येचा आकडा २२ हजार ५०३ वर पोहोचला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात कोरोनामुळे १ मृत्यू झालेला आहे. सध्या विविध रुग्णालयात ३३ गंभीर रुग्णांवर तर १६२ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत ४० लाख २८ हजार ३०४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातील ५ लाख ३७ हजार ४१८ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ५ लाख ५ हजार ७८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात ९ हजार १३१ जणांचा मृत्यू झाला आहे.