नरेंद्र मोदींवर आई-वडिलांपेक्षाही अधिक श्रद्धा, गप्प बसणार नाही; चंद्रकांत पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 12:57 PM2021-11-01T12:57:56+5:302021-11-01T13:13:33+5:30

नरेंद्र मोदींवर आमची आई-वडीलांपेक्षाही अधिक श्रद्धा आहे. गप्प बसणार नाही असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे

More faith in Narendra Modi than his parents, will not remain silent; Chandrakant Patil's warning | नरेंद्र मोदींवर आई-वडिलांपेक्षाही अधिक श्रद्धा, गप्प बसणार नाही; चंद्रकांत पाटलांचा इशारा

नरेंद्र मोदींवर आई-वडिलांपेक्षाही अधिक श्रद्धा, गप्प बसणार नाही; चंद्रकांत पाटलांचा इशारा

googlenewsNext

पुणे: सरकारमध्ये असतानाही शिवसेनेची बाहेर पडण्याची हिंमत नव्हती. त्यावेळी ते कोरे कागद घेऊन फिरायचे. राज्यात ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे त्याची सुरुवात कोणी केली ते एकदा तपासले पाहिजे. तुम्ही रोज उठून नरेंद्र मोदींना (Nrendra Modi) चौकीदार चोर हे म्हणता, हे चालणार नाही. नरेंद्र मोदींवर आमची आई-वडीलांपेक्षाही अधिक श्रद्धा आहे. गप्प बसणार नाही असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी कधी कुणाच्या बायकोवर आरोप केले नाहीत. ते रोज उठून अमृता वहिनीवर आरोप करत असतात. तरीही त्यांनी किती संयम बाळगायचा. संजय राऊतांच्या नवाब मलिकांच्या पत्नीबद्दल कोणी काही बोललं का ? शरद पवारांच्या कुटुंबाबद्दल कोणी काही बोललं का ? राजकारणात असणाऱ्यांनी एकमेकांवर बोलावं. अमृता वहिणीचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्यांना त्यांचं करिअर आहे. तरीही त्या शांत राहतात.

वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलेलं राजकारण थांबले पाहिजे का असे विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, कोंबडी आधी की अंडे आधी हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जर असं वाटत असेल तर हा संशोधनाचा विषय आहे. चार पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून राजकारणाबाबत काहीतरी आचारसंहीता ठरवली पाहिजे. पुरावे नसतानाही तुम्ही आरोप करता, तीनही पक्षाचे प्रवक्ते एकत्र येऊन आरोप करतात. तरीही आम्ही एकटे त्यांना पुरून उरतो.

Web Title: More faith in Narendra Modi than his parents, will not remain silent; Chandrakant Patil's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.