शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
7
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
8
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
9
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
10
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
11
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
12
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
13
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
14
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
15
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
16
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
17
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
18
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
19
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
20
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी

अपंगांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त

By admin | Published: March 17, 2016 3:24 AM

अपंग व्यक्तींचे सामाजिक व शैक्षणिक जीवनमान उंचावणे व त्यांच्या उन्नतीसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागा तसेच जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत

- प्रज्ञा केळकर-सिंग,  पुणेअपंग व्यक्तींचे सामाजिक व शैक्षणिक जीवनमान उंचावणे व त्यांच्या उन्नतीसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागा तसेच जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत वेगवेगळ््या योजना राबवण्यात येतात. अपंग व्यक्तींना सरळ सेवेमध्ये भरती तसेच पदोन्नतीसाठी ३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे. मात्र, शासनप्रक्रियेतील उदासीनता आणि कागदपत्रांतील क्लिष्टता यामुळे शासनाच्या ३६ विभागांमधील अपंगांसाठी राखीव असलेली निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत.शासकीय व शासन अधिपत्याखालील कार्यालयामध्ये गट अ ते गट ड पदावर सरळ सेवाभरतीमध्ये अंध १ %, कर्णबधिर १ %, आणि अस्थिव्यंग १ % असे एकूण ३ टक्के आरक्षण अपंगांसाठी राखीव आहे. तसेच शासकीय व निमशासकीय सेवेतील अंध / अल्पदृष्टी, कर्णबधिर आणि अस्थिव्यंग प्रवर्गातील अपंग कर्मचाऱ्यांना गट कमधून गट ब, गट ड मधून गट कमध्ये नियुक्तीस योग्य ठरविलेल्या पदावर पदोन्नतीमध्ये ३ टक्क्यांपर्यंत आरक्षण ठेवण्यात आले आहे. मात्र, सरळ सेवा भरती आणि पदोन्नतीमधील निम्म्याहून अधिक जागा रिक्त असल्याने दहावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या अपंगांना बेरोजगार म्हणून जगावे लागत आहे. क्षमता असून या व्यक्ती योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.शासकीय व शासन अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये सरळ सेवा भरतीएकूण जागा५६३९नेमणुका२१८८रिक्त२७७६पदोन्नतीसाठी अनुशेषएकूण जागा१४३०नेमणुका६०४रिक्त८५०जानेवारी २०१४ मध्ये सरळ सेवा भरतीसाठी मी अर्ज केला होता. ९ मार्च २०११ च्या अध्यादेशानुसार रिक्त जागांसाठी जाहिरात देण्यात आली होती. १९ मार्च रोजी हा अध्यादेश रद्द करण्यात आला. या गोंधळाचा फटका सामान्य अपंगांना बसला. त्यामुळे मी न्यायालयात खटला दाखल केला होता. २ सप्टेंबर २०१५ मध्ये या खटल्याचा निकाल आमच्या बाजूने लागला. २ महिन्यांच्या आत सेवा भरती करावे, असा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र, या आदेशाची अद्याप पूर्तता करण्यात आलेली नाही. - योगेश भोसलेआयुक्तालयाकडे आलेल्या अर्जांचा बारकाईने विचार करून प्रत्येक अपंग व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. न्यायालयाने निर्णय देऊनही प्रक्रिया होत नसेल तर आम्ही स्वत: त्यामध्ये लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्यााचा प्रयत्न करू.-नितीन ढगे, उपायुक्त