पुुणे : शहर व जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरून झालेल्या नुकसानासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये शासनाने आर्थिक मदत केली आहे. शासनाच्या आदेशानुसार ही मदत आता शहरी भागात प्रत्येकी १५ हजार व ग्रामीण भागात प्रत्येकी १० हजार रुपये केली आहे. पूरग्रस्तांना अधिक मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य शासनाकडे ५ कोटी ६१ लाख ८० हजारांची मागणी केली आहे. ही मदत आल्यानंतर त्वरित पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करू, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी दिली.पुणे शहरातील तब्बल ९ हजार ३१५, पिंपरी-चिंचवड येथील ४ हजार ८८०, हवेली ग्रामीण २ हजार ३६३ नागरिकांना फटका बसला. तर, ग्रामीण भागात बारामती ७७१, भोर २१, दौंड ९८४, इंदापूर २१९, मावळ १४, मुळशी १२४, पुरंदर २८२, शिरूर १३१ अशा एकूण १९ हजार २२० नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातदेखील पूरग्रस्तांना मदत करण्याची मागणी केली. त्यानुसार शासनाने प्रत्येकी ५ हजार रुपये मदत करण्याची घोषणा केली. शासनाने २१ कोटी ८७ लाख ७० हजारांची मदत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाने पंचनामे करून या मदतीचे वाटप केले. त्यानंतर नागरिकांनी अधिक मदत करण्याची मागणी केली. त्यानुसार शहरी भागात प्रत्येकी १५ हजार रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रत्येकी १० हजार रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला. आता ५ कोटी ६१ लाख रुपयांची आवश्यकता असून, शासनाकडून निधी आल्यास त्वरित त्याचे वाटप सुरू करण्यात येईल.......अनेकांची घरे पाण्यातपुणे शहर आणि जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले, पावसामुळे अनेकांची घरे, संपूर्ण संसार पाण्यात गेला.
पुुणे शहर, जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मिळणार अधिक मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 12:09 PM
जिल्हाधिकाऱ्यांची पावणेसहा कोटींची मागणी
ठळक मुद्देजिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातदेखील पूरग्रस्तांना मदत करण्याची मागणी