पुरंदर तालुक्यातील कोरोनाचे हाॅटस्पाॅट असलेल्या गावात भेट देऊन आढाव घेत प्रशासानच्या अधिकाऱ्यांना तहसीलदार सरनोबत यांनी सूचना दिल्या. त्यावेळी त्या नीरा येथे बोलत होत्या. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आढावा घेतेवेळी वाल्हा मंडलाधिकारी संदीप चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक आबनावे, नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय चव्हाण, तलाठी बजरंग सोनवले नीरा, गणेश महाजन गुळूंचे, नंदकुमार खरात मांडकी, शीतल खरात जेऊर, नीलम भोगवडे पिंपरे (खुर्द), आरोग्य सहायक पोपट गोडसे, गणेश शिंदे, आरोग्यसेविका मनीषा धुमाळ, शुभांगी चव्हाण उपस्थित होत्या.
तालुक्यातील हाॅटस्पाॅट असलेल्या वाघापूर, कोळविहिरे, पिंपरे (खुर्द), गुळुंचे व नीरा येथील आरोग्य विभागाचे अधिकारी, मंडलाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्याशी चर्चा करत पुढील काळात घ्यावयाची खबरदारी व उपाययोजना सरनोबत यांनी सांगितल्या.
यापुढे ज्या कुटुंबातील व्यक्ती कोरोना पाँझिटिव्ह येतील त्यांच्या घराच्या परिसरात कॅन्टोन्मेंट झोन करावा. लोकांमध्ये जनजागृती करावी. लसीकरणासंदर्भात असलेले गैरसमज दूर करावेत. वृृद्धंाना लसीकरणास प्रोत्साहित करावे. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील कळात मुबलक लस उपलब्ध केली जाईल. लोकमतने मंगळवारी 'अपुऱ्या लस पुरवठ्याने नीरा येथील जेष्ठ नागरीक त्रस्त' या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली. आज पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आढावा घेते वेळी लसीच्या टुटवड्याची चौकशी केली .. नीरा शहराल लागुन असलेल्या बारामती तालुक्यातील तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण व खंडाळा तालुक्यातील जेष्ठ जवळचे आरोग्य केंद्र म्हणून नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करत आहेत. त्यामुळे यापुढे शंभर ऐवजी दोनशे लोकांचे लसीकरण करण्यासाठी मुबलक प्रमाणात लस नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रा उपलब्ध करून देण्याचे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्रात आढावा घेते वेळी पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत, महसूलचे व आरोग्य अधिकारी