पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे मांढरदेवी यात्रेनिमित्ताने येत्या ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे भाविकांच्या सोईसाठी येत्या १६ जानेवारीपर्यंत दर मंगळवारी, शुक्रवारी व रविवारी यात्रेसाठी गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.मांढरदेवी यात्रेस राज्यातील लाखो भाविक दर्शनासाठी जातात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातर्फे शिवाजीनगर, स्वारगेट, भोर, नारायणगाव, राजगुरूनगर, तळेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, सासवड, दौंड, पिंपरी-चिंचवड या बसस्थानकावरून जादा बसेस सोडल्या जातील. पौष पोर्णिमेनिमित्त नारायणपूर, थापलींग, वरवे, कोरथन येथेही जादा बसेस सोडल्या जातील. यात्रेनंतर पौष आमवस्येपर्यंत प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी व रविवारी मांढरदेवीसाठी स्वारगेट व भोर येथून जादा गाड्या सोडल्या जाणार असल्याने भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे विभागाचे नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी केले.
मांढरदेवी यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे पुण्यातून जादा गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 4:11 PM
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे मांढरदेवी यात्रेनिमित्ताने येत्या ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
ठळक मुद्देभाविकांच्या सोईसाठी येत्या १६ जानेवारीपर्यंत दर मंगळवारी, शुक्रवारी व रविवारी यात्रेसाठी गाड्यापौष आमवस्येपर्यंत प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी, रविवारी मांढरदेवीसाठी स्वारगेट, भोर येथून जादा गाड्या