लोकमत न्यूज नेटवर्कसोमेश्वरनगर : लाटे (ता. बारामती) येथील नरीा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याकडे पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दहा वर्षांपासून या बंधाऱ्याला संरक्षक कठडेच नसल्याने या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. या ठिकाणावरून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. लवकरात लवकर या ठिकाणी संरक्षक कठडे बसवावे, अशी मागणी बारामती तालुक्यातील लाटे, थापेटेवाडी, कोऱ्हाळे, बजरंगवाडी, माळशिकारेवाडी, कुरणेवाडी, माळवाडी, तसेच फलटण तालुकयातील खुंटे, शिंदेवाडी, धुमाळवाडी, जिंती येथील ग्रामस्थांनी केली आहे. दर वर्षी येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे नीरा नदीवरील सर्वच बंधारे कमकुवत झाले आहेत. तर ढापे गंजले असून बंधाऱ्यामधून लाखो लिटर पाण्याची गळती होत आहे. वारंवार दुरुस्ती करूनही हे बंधारे वारंवार उखडत आहेत. लाटे या ठिकाणी बांधण्यात आलेला बंधारा हा सोळा वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. तेव्हा त्या बंधाऱ्याला संरक्षण कठडे उभारण्यात आले होते. मात्र त्यानंतर आलेल्या मोठया पुराने ते वाहून गेले होते. आज याला सात ते आठ वर्ष झाली तरीही बंधाऱ्याला संरक्षक कठडे उभारण्याची तसदी पाटबंधारे खात्याने घेतली नाही. त्यामुळे हा बंधारा वाहतूकीसाठी धाकादायक बनला आहे. या बंधाऱ्याला संरक्षक कठडेच नसल्याने याठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. वारंवार मागणी करूनही या ठिकाणी संरक्षक कठडे बसविले जाते नाही. संरक्षक कठडयाअभावी होत असलेला अपघाताचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे, असे थोपटेवाडीचे ग्रामस्थ प्रमोद पानसरे यांनी सांगितले. बंधाऱ्याचे किनार खचलेबंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचे किनारे वाळूू आणि व मातीच्या उपशामुळे खचले आहेत. संबंधित खात्याने याकडे लक्ष देऊन ताबडतोब याची दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बंधाऱ्याच्या पलीकडे म्हणजे सातारा हद्दीत शिंदेवाडी याठिकाणी केबी कंपनी तसेच सुरवडी या ठिकाणी कमीन्स कंपनी असल्याने बारामती तालुकयातील सुमारे दहा ते पंधरा गावांतील हतारच्या आसपास महीला व पुरूष नोकरी निमित्त या बंधाऱ्यावरून ये जा करत असतात, तसेच पुणे आणि सातारा या दोन जिल्हयांना जोडणारा हा बंधारा असल्याने निरा नदीकाठाच्या नागरीकांना देवाण घेवाण साठी हा बंधारा अत्यंत उपयोगी आहे.
बंधाऱ्याचे संरक्षक कठडे तुटलेले
By admin | Published: May 07, 2017 2:23 AM