- विशाल शिर्केपुणे - डासाच्या चाव्याने पाच वर्षांत राज्यातील ६६६ जणांचा बळी घेतला आहे. डेंगीमुळे ४१३ आणि मलेरियामुळे २५३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. राज्यात पुण्यात डेंगीच्या सर्वाधिक ६६ आणि मुंबईत मलेरियाच्या सर्वाधिक ८३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याच्या कीटकशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे.मलेरियाच्या तुलनेत डेंगीने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक अहे. दर वर्षी सरासरी ६ हजार रुग्णांना डेंगीची लागण होते. त्यातील ८२ रुग्णांचा दर वर्षी मृत्यू होतो. तर, मलेरियाची ४० ते ४२ हजार रुग्णांना लागण होते. त्यांपैकी सरासरी ५० रुग्णांचा दर वर्षीमृत्यू झाला आहे. राज्यात डेंगीचा प्रादुर्भाव पुणे, मुंबई, ठाणे,नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांत दिसून आहे.राज्यात २०१३ ते २०१७ या कालावधीत डेंगीमुळे झालेल्या ४१३ मृत्यूपैकी २३८ मृत्यू याच ५ जिल्ह्यांतील आहेत. पुण्यामध्ये पाच वर्षांत ६६, मुंबई ५४, ठाणे ५१, नाशिक ३४ आणि नागपूरला ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, मे २०१८पर्यंत राज्यात डेंगी बाधितांची संख्या ५४३ असून, एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती समोर आणली आहे.मलेरियाचा प्रादुर्भाव मुंबईत अधिक असून, तेथे सरासरी ८ ते १० हजार रुग्णांना मलेरियाची बाधा होते. त्यातील एकट्या मुंबईतच ८३ रुग्णांचा २०१३ ते २०१७ या कालावधीत मृत्यू झाला आहे. पाठोपाठ ठाणे ४८, गडचिरोली ४४, गोंदिया २१ आणि चंद्रपूरला १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मे २०१८ अखेर २ हजार ४५७ जणांना मलेरियाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.इंडियन मेडिकल असोसिएशन पुणेच्या अध्यक्ष डॉ. पद्मा अय्यर म्हणाल्या, की मलेरिया आणि डेंगी दोन्ही रोगांचा प्रसार डासांनी चावल्याने होतो. शहरात दररोज डेंगी बाधित रुग्ण आढळून येत आहेत.ताप आणि हाडे दुखण्याचा त्रास झाल्यास डेंगीचे लक्षण समजावे. मलेरियात प्रचंड डोकेदुखी, थकवा अणि जोराचा ताप येतो. यातील प्रकारानुसार आजाराची तीव्रता वाढते. डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेऊन, त्याप्रमाणे औषधांचा डोस घेणे हा चांगला उपाय आहे. कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत: कोणतीही औषधे परस्पर घेऊ नयेत.मलेरियाचा रोगवाहक घटकप्ललाझामोडीयम प्रजातीच्या एकपेशीय सूक्ष्म परजीवी जंतूंचा संसर्ग झाल्याने हिवताप (मलेरिया) होतो. त्याचा प्रसार काही अॅनाफिलीस डासाच्या मादीमुळे होतो. भारतात आढळणाऱ्या अॅनाफिलीसच्या सुमारे ५८ जातींपैकी केवळ काहींच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार होतो.ग्रामीण भागात अॅनॉफिलीस क्युलेसिफेसीस व शहरी भागात अॅनॉफिलीस स्टिफेन्सी हे डास रोगाचे वाहक आहेत. दूषित डास चावल्यानंतर त्वचेद्वारे, स्नायुद्वारे आणि शिरेद्वारे देण्यात येणारे रक्त अथवा प्लाझमाच्या अपघाताने मिलेरिया शकतो. मातेकडून नवजात अर्भकास जन्मजात मलेरिया होऊ शकतो.डेंगी आला वेस्ट इंडीजमधूनजगामध्ये डेंगीचा उद्रेक गेल्या तीन शतकांपासून शीतोष्ण, समशीतोष्ण व उष्ण कटिबंधात आढळून आलेला आहे. डेंगीचा पहिला उद्रेक इसवी सन १६३५मध्ये वेस्ट इंडीज येथे झाला. डेंगी ताप व एडिस इजिप्टाय डास प्रामुख्याने जगातील शीतोष्ण कटिबंधात पसरलेले आहेत.सध्या २५ दशलक्ष लोक डेंगी संवेदनशील भागात वास्तव्य करतात. डेंगी हा विषाणूपासून होणारा आजार असून, त्याचा प्रसार एडीस इजिप्टाय डासांमार्फत होतो. मागील दोन दशकांपासून डेंगी हा ताप, रक्तस्रावी ताप व शॉक सिंड्रोमचे रुग्ण संपूर्ण जगात आढळून येत असून, त्यात सातत्याने वाढ होत आहे.अनियंत्रित लोकसंख्यावाढ, अनियोजित व अनियंत्रित शहरीकरण, कचºयाचे अयोग्य व्यवस्थापन, सदोष पाणीपुरवठा ही कारणे आहेत. डेंगीचा डास दिवसा चावणारा असून, त्याची उत्पत्ती घरातील व परिसरातील भांडी, टाक्या व टाकाऊ वस्तू यांतील स्वच्छ पाण्यात होते.
डासाचा चावा, काळाचा घाला, पुणे-मुंबईत सर्वाधिक बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 1:54 AM