शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

पुण्यामध्ये सर्वाधिक दावे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 1:51 AM

राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने दर तीन महिन्यांनी आयोजिण्यात येत असलेल्या महालोकअदालतीमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने पहिला क्रमांक मिळवला.

पुणे : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने दर तीन महिन्यांनी आयोजिण्यात येत असलेल्या महालोकअदालतीमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने पहिला क्रमांक मिळवला.राज्यात ३४ जिल्ह्यांत ८ सप्टेंबरला महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण ७ लाख ७९ हजार ५८३ खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ३८ हजार ६४ दावे निकाली काढण्यात आले. पुणे जिल्ह्यात ७९ हजार ३१२ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३७ हजार ७२१ दावे निकाली काढण्यात आले, तर सातारा जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तेथे १ लाख १७ हजार ७२१ पैकी ३२ हजार ६१५ दावे निकाली निघाले. त्यानंतर तिसरा क्रमांक रागयड जिल्ह्याचा लागला. रायगडमध्ये ५९ हजार ९२७ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी १४ हजार ५१४ दावे निकाली काढण्यात आले. पुण्यात निकाली काढलेल्या दाव्यात ३५ हजार ४४७ दावे दाखलपूर्व आहेत, तर २ हजार २७४ दावे प्रलंबित स्वरूपाचे आहेत. यात ३९ कोटी ४० लाख ९३ हजार २५८ रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्यात आली. दाखलपूर्व आणि प्रलंबित असे दोन प्रकारचे दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते, अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टुरकर यांनी दिली.जुलै महिन्यात झालेल्या लोकअदालतीमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने तिसरा क्रमांक मिळवला होता. पुण्यात ६५ हजार १४७ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी २५ हजार ७६५ दावे निकाली काढण्यात आले. निकाली काढलेल्या दाव्यात २३ हजार १४२ दावे दाखलपूर्व आहेत, तर २ हजार ६२३ दावे प्रलंबित स्वरूपाचे होते. २० कोटी ३५ लाख ८३ हजार ६८३ रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्यात आली होती. धनादेश बाऊन्स, बँक, मोटार अपघात न्याय प्राधिकरण, वीज, पाणी, वैवाहिक, जमिनीसंबंधी वाद, महसूल, विविध सेवा आणि तडजोड योग्य फौजदारी, दिवाणी स्वरूपाचे प्रलंबित दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी लोकअदालत होते.>मोटार अपघात न्याय प्राधिकरणाच्या ३६ दाव्यांत तडजोडअपघातात मृत्यू व्यक्तींचे वारस अथवा जखमी झालेल्या व्यक्ती नुकसानभरपाईसाठी मोटार अपघात न्याय प्राधिकरणात दावा दाखल करतात. महालोकअदालतीत अशा स्वरूपाचे ११५ दावे तडजोडीसाठी होते. त्यापैकी ३६ दाव्यांमध्ये तडजोड झाली. त्यामध्ये २ कोटी ६६ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. अतुल गुंजाळ यांनी दिली.>कौटुंबिक न्यायालयात ८ खटले निकालीकौटुंबिक न्यायालयातदेखील लोकअदालत भरविण्यात आली होती. या ठिकाणी एकूण ७२ खटले निकालासाठी ठेवण्यात आले होते. त्यातील ८ दावे निकाली निघाले. न्यायाधीश व्ही. व्ही. शहापूरकर, एस. जी. तांबे आणि डी. डी. जोशी यांच्या पॅनलने हे आदेश दिले, अशी माहिती दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी दिली.>जिल्हा निकाली निघालेले दावे नुकसानभरपाईपुणे ३७,७२१ ३९,४०,९३,२५८सातारा ३२,६१५ १६,९४,९२,३०३रायगड १४,१६४ १४,९४,०९,१००नाशिक १२,५१४ १६,९७,३५,६८७मुंबई ५९३२ १८,०७,०३,४०३