भूगाव : विज्ञानाच्या प्रगतीसोबतच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकावर आली आहे. पर्यावरणाचे संतुलन न राखल्यास मानवाला त्याची भविष्यात प्रचंड मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. ग्रामीण भागात विवाह आणि अन्य समारंभात जेवणासाठी थर्माकोलच्या पत्रावळी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. समारंभानंतर त्यांची योग्य विल्हेवाट न लावता परिसरात फेकून, जाळून टाकल्या जातात. त्यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.गावात होणाऱ्या भोजनावळीतून भांडी हद्दपार होऊ लागली आहे. पानांच्या पत्रावळीऐवजी थर्माकोलच्या पत्रावळी व प्लॅस्टिकचे ग्लास वापरण्यावर भर दिला जात आहे. हा सर्व कचरा मोकळ्या जागेत किंवा रस्त्यावर फेकला जातो. त्याचे विघटन होत नसल्याने हवेमार्फत हा हलका कचरा सर्वत्र पसरतो. तसेच या पत्रावळ्यांतील अन्न गाय, बैल, कुत्रे यांसारखे पाळीव जनावरे खाता खाता थर्माकोलचा अंशही त्यांच्या पोटात जातो. हे खाऊन जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. तसेच या पत्रावळी जाळल्याने निर्माण होणारा वायू सजिवांच्या जीवनाला घातक ठरतो.भारतात वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या चालत आलेले पळसाच्या पानांच्या पत्रावळी, द्रोण आणि केळीची पाने जेवणावळीमधून इतिहासजमा झाली आहेत. यांच्यावर उपजीविका करणारे हजारो कुटुंब या व्यवसायापासून कोसो दूर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. ग्रामीण भागात विवाह आणि अन्य समारंभात जेवणासाठी थर्माकोलच्या पत्रावळी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. समारंभानंतर त्यांची योग्य विल्हेवाट न लावता परिसरात फेकून दिल्या जातात. पर्यावरणासाठी नुकसानकारक ठरणाºया कॅरीबॅगच्या बंदीच्या अंमलबजावणीचे आव्हान कायम असताना या पत्रावळींचे नवे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या संयोजकांनी पत्रावळींची योग्य विल्हेवाट लावण्याची काळजी घेतली पाहिजे.
पळसाची पत्रावळी रुची व भूक वाढवणारीझाडांच्या पानांपासून केलेलं पात्र रुची वाढवणारे, भूक वाढविणारे आहे. आपल्याकडे पळसाच्या पानांपासून पत्रावळी तयार केल्या जातात. काही वेळा जेवण्याकरिता केळीच्या किंवा कर्दळीच्या पानांचाही वापर केला जातो. बंगालमध्येही हीच पद्धत रुढ आहे. आपण मात्र मागासलेली, जुनाट म्हणून या पत्रावळी हळूहळू बाद करत आणल्या आहेत. व्यावहारिकदृष्ट्या खर्चही कमी येतो आणि ती सवय निसर्गाच्या अधिक जवळ आणणारी आहे.