पुणे : हिंदी महासागरात विषववृत्ताजवळ निर्माण झालेली दोन चक्रीवादळे, निरभ्र आकाश, दुष्काळी स्थिती आणि हवेचे चलनवलन अशा विविध कारणामुळे गेले काही दिवस कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे़. त्यामुळेच २६ एप्रिलचा दिवस हा पुण्यातील गेल्या शंभर वर्षातील एप्रिलमधील सर्वात तप्त दिवस ठरला असल्याचे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले़ .
पुणे शहरात ३० एप्रिल १८९७ मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान ४३़३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते़. त्यानंतर २६ एप्रिल २०१९ मध्ये सर्वाधिक कमाल तापमान ४२़६ अंश सेल्सिअस गेले होते़. याविषयी बोलताना डॉ़ जीवनप्रकाश कुलकणी यांनी सांगितले की, गेल्या शंभर वर्षातील कमाल तापमान पाहिल्यावर दर ३० वर्षांची असे सायकल येत असते़. १९८० नंतर तापमान वाढत चालले आहे़ त्याअगोदर ४०च्या जवळपास कमाल तापमान असे़ त्यात एखाद्या डिग्री कमी जास्त होत असे़. आता कमाल तापमान वाढण्यामध्ये अनेक कारणे आहेत़.
मार्चमध्ये सूर्य विषववृत्त ओलांडून उत्तरेकडे येऊ लागला की मार्च, एप्रिल, मे, जूनमध्ये तापमान वाढत जाते़. मध्य भारत, उत्तर भारत हा मोठा भूभागाचा प्रदेश आहे़ तर दक्षिणेकडे तो निमुळता होत जातो़. त्याच्या दोन्ही बाजूला समुद्र असल्याने त्या ठिकाणचे तापमाना जास्त वाढू शकत नाही़.
त्याचवेळी हिंदी महासागरात विषववृत्ताच्या दक्षिणेला एक चक्रीवादळ तयार झाले आहे़. त्यामुळे तेथील हवा वर वर जात आहे़ ही हवा मध्य भारत, उत्तर भारतात खाली येताना पुन्हा गरम होत आहे़. तसेच विषववृत्ताच्या उत्तरेला आणखी एक चक्रीवादळ तयार होत आहे़. आणि श्रीलंकेच्या जवळपासही चक्रीवादळ तयार झाले आहे़. ही हवा वर वर जात असल्याने पुढील काही दिवसात तामिळनाडुमध्ये पावसाची शक्यता आहे़ मात्र, त्याचवेळी उत्तर भारतात खाली उतरणाºया गरम हवेमुळे उत्तर, मध्य भारत तापला आहे़. याचा परिणाम पुण्यासह सर्वत्र कमाल तापमानाचा उच्चांक गाठला जात आहे़ याबरोबरच हवेचे चलनवलन कसे आहे, यावर तापमान ठरते़ .
याचे उदाहरण द्यायचे झाले तर बंद खोलीतील हवामान आणि उघड्या खोलीतील तापमानात जसा फरक पडतो तसेच जर गरम हवा साचू राहिली तर तेथील तापमानात मोठी वाढ होऊ शकते़. तापमान वाढीत हा व्हेटिलेशन इंडेक्सही महत्वाचा ठरतो़. या कारणांमुळे पुण्यात शंभर वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. १८९७ मध्येहीही अशीच परिस्थिती निर्माण झाली असेल़ त्याच्या अगोदरच्या वर्षी दुष्काळी स्थिती असण्याची शक्यता असल्याने जमिनीतील ओलावा जवळजवळ नसल्यासारखा असू शकतो़. त्यामुळे तेव्हा ४३़३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले असेल़ विषववृत्तावर निर्माण झालेली चक्रीवादळाची स्थिती अजून २ दिवस तरी राहणार आहे़. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील कमाल तापमान असेच वाढते राहण्याची शक्यता आहे, असे डॉ़ जीवन प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले़ .