पुणे : शहरीकरण, स्थलांतर होत असताना नगर नियोजनाकडे सर्वाधिक दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शहरे बकाल झाली आहेत. त्यासाठी आपल्याकडे कुशल मनुष्यबळ आहे का? यापुढील काळात नगर नियोजनाचा विचार करताना पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले.सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशनच्या ब्रिक ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सच्या पहिल्या पदवी प्रदान समारंभात फडणवीस बोलत होते.ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संस्थेच्या विश्वस्त अध्यक्ष व आमदार माधुरी मिसाळ, व्यासपीठावर उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, एकीकडे उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असताना, देश उभारणीत ते योगदान देऊ शकतात का, याचा विचार करणे आवश्यक आहे.कुशल मनुष्यबळ नसल्यासहा विकास टिकवू शकणार नाही. आपण ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या टप्प्यावर आहोत.>सातच्या आत घरात...पंकजा मुंडे म्हणाल्या, पुर्वी मुलींसाठी ‘सातच्या आत घरात’ची व्याख्या सायंकाळसाठी होती. आता ते सकाळचे सात झाले आहेत. खूप संधी निर्माण झाल्या आहेत. खूप आव्हाने आहेत, त्याला सामोरे जायला हवे.
नगर नियोजनाकडे सर्वाधिक दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 5:44 AM