याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोनिका चंद्रावळे ही महिला सकाळच्या सुमारास काही तणावात होती. त्यामुळे सकाळीच ती तिच्या मुलाला घेऊन बाहेर पडली होती. दुपारपर्यंत ते कोणालाच दिसले नाहीत. दुपारच्या सुमारास शेजारील काही नागरिकांना शेतात काम करत असताना तेथील विहिरीतील पाण्यावर मोनिका व ऋषी यांच्या चपला तरंगत असल्याचे दिसले. त्यामुळे दोघा मायलेकांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तविला गेला. घटनेची माहिती मिळताच करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस हवालदार किशोर तेलंग आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, काही नागरिकांनी लोखंडी गळ व दोरीच्या सहाय्याने विहिरीमधील मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला असता, मोनिका आणि ऋषी यांचे मृतदेह मिळून आले.
दरम्यान, मोनिकाचा पती भगवान चंद्रावळे यांनीदेखील आत्महत्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची परिस्थिती स्थिर आहे. याबाबत गुरुदास गुलाब चंद्रावळे (वय ३३, रा. करंदी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून, शिक्रापूर पोलिसांनी मोनिका व ऋषीच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.
--
फोटो क्रमांक : १३ मोनिका चंद्रेवळे
फोटो क्रमांक : १३ ऋषी चंद्रावळे