शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

माता, बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्ह्यात मातृवंदना सप्ताह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 2:24 PM

माता, अन् बालमृत्यू हे आरोग्यविभागापुढे आव्हान

ठळक मुद्देआठवड्यात विविध कार्यक्रम : सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन 

पुणे : माता, बालमृत्यू रोखण्यासाठी आणि या संदर्भात जनजागृती करण्यासाठी राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजना अमलात आणण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हे प्रमाण रोखण्यासाठी व्यापक प्रमाणावर पावले उचलली जात आहे. याचाच एक भाग म्हणून आजपासून येत्या रविवारपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जिल्ह्या परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. माता, अन् बालमृत्यू हे आरोग्य विभागापुढे आव्हान आहे. यामुळे हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत प्रथमच ज्या मातांची प्रसूती झाली किंवा गर्भधारणा झाली असेल त्यांना शासनाकडून या योजनेंतर्गत मदत केली जाते. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलेस एकूण तीन टप्प्यात पाच हजार रुपयांचा लाभ मिळतो. मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १०० दिवसाच्या आत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता एक हजार रुपये तसेच किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास, गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता २ हजार रुपये, प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटॅटीस बी किंवा त्या अनुषंगिक लसीकरणाचा पहिला डोस दिल्यानंतर तिसरा हप्त्याची २ हजार रुपये रक्कम शासनातर्फे दिली जाते. यासाठी महिलांनी या योजनेअंतर्गत नोंदणीकरणे गरजेचे आहे. बाळ हे गर्भात असतांनाचा त्याचे कुपोषण सुरू होते. याचा परिणाम बालकाच्या जन्मानंतर दिसतो. ग्रामीण भागात अनेक कुटुंबियांची  आर्थिक स्थिती  कमकुवत असते. यामुळे त्यांना खर्च परवडत नाही. बाळंतपणाच्या शेवटच्या महिन्यापर्यंत महिलांची कामे सुरूच असतात. या सर्वांचा मातेच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच दुधावरही परिणाम होत असल्याने मुलाला पुरेशा प्रमाणात दूध मिळत नाही. या सर्वांमुळे केंद्र शासनाने जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु केली. या योजनेची सुरूवात डिसेंबर महिन्यापासून राज्यात करण्यात आली आहे..............सर्व आरोग्य केंद्रात माहितीपत्रकांचे वाटप...महिला आणि बालकाच्या आरोग्यासाठी या सप्ताहाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभात फेरीचे आयोजन करणे, पात्र लाभार्थ्यांकडील अर्जाची नोंदणी घरोघरी जाऊन करणे, लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, ग्रामसभा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या बैठका घेणे असे विविध उपक्रम जिल्ह्यात राबविले जाणार आहेत. मातृवंदना सप्ताहनिमित्त सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व सेवा क्षेत्रांमध्ये माहितीपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. याचा लाभ पात्र लाभार्थी महिलांनी घ्यावा.- डॉ. भगवान पवार,  जिल्हा आरोग्य अधिकारी 

टॅग्स :PuneपुणेPregnancyप्रेग्नंसीWomenमहिलाHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल