शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आठ दिवसांचे बाळ अनाथालयात देऊन आई निघून गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 1:06 PM

लग्नापूर्वीच दिवस गेल्याने दोघांच्या कुटूंबियांनी संमतीने त्यांचे लग्न लावून दिले...

ठळक मुद्देतरुण सज्ञान जोडप्याच्या वैवाहिक संसारातील दुराव्याचा फटका चिमुकल्या जिवाला : बाळाचा सांभाळ करण्यास पित्याचा पुढाकार

युगंधर ताजणे- 

पुणे :  व्यवसायाने दोघेही इंजिनिअर. कामाच्या ठिकाणी एकमेकांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्या तीन वर्षांच्या प्रेमात दोघांचा धर्म आड आला नाही. पुढे लग्नापूर्वीच दिवस गेल्याने दोघांच्या कुटूंबियांनी संमतीने त्यांचे लग्न लावून दिले. तिने बाळाला जन्म दिला. मात्र सातत्याने त्यांच्यात होणाऱ्या वादाने दोघांमधील संसार मोडळकीस आला. यासगळ्याचा फटका त्या आठ दिवसांच्या चिमुकल्याला सहन करावा लागत आहे. बाळाच्या आईने ते बाळ अनाथलयात देत असल्याचे संमतीपत्रक लिहून दिले.  अखेर पित्याने बाळचा सांभाळ करण्यास पुढाकार घेतला.   अरुण आणि सरिता (दोघांची नावे बदलली आहे) दोघेही उच्चशिक्षीत. व्यवसायाने इंजिनिअर. तो मुळचा राहणारा हरियाणाचा तर ती पुण्याची. मुंबईत एका कंपनीत काम करताना त्यांची ओळख झाली. ओळखीतून जवळीक वाढली. त्यांच्या या आंतरधर्मीय प्रेमाला दोघांच्या घरच्यांकडून कडाडून विरोध.  अरुण आणि सरिता यांच्यातील वाढत्या जवळकीतेने सरिताला दिवस गेले. ती गरोदर आहे असे कळताच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. घरच्यांना ही गोष्ट कळवली. त्यांनी संमतीने त्यांचे लग्न लावून दिले. मात्र सरिताने आई वडिलांचे सांगण्यानुसार, सासरच्या व्यक्तींकडून होणारा मानसिक व शारीरिक छळ आणि घरातून बाहेर काढण्याची तक्रार करुन त्यासंबंधीची नोटीस अरुणला पाठवली.  इतकेच नव्हे तर यापुढे जन्म दिलेल्या बाळाचा व अरुणचा स्वीकार करण्यास आपण तयार नसल्याचे तिने म्हटले.    बाळ अनाथलयात वाढु नये.  बाळाला त्याच्या पित्याची गरज असणे, एकूण संपूर्ण परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर बाळाला त्याच्या कुटूंबियांच्या ताब्यात देणे महत्वाचे आहे. असा विचार करुन आवश्यक ती तपासणी व खात्री करुन बालकल्याण समितीने बाळाचा ताबा पित्याकडे दिला. मुलाच्या आईवडिल तसेच इतर नातेवाईकांनी देखील त्या बाळाचा स्वीकार केला. सरिताने आपण बाळ अनाथलयाकडे सुपूर्द करत आहोत असे संमतीपत्रक लिहून देत ती घरच्यांसमवेत निघुन गेली.  ........* बालकल्याण समिती पुणे, 1 यांच्याकडे अरुण व सरिता यांचे प्रकरण आल्यानंतर त्यांनी दोघांचे समुपदेशन केले. समितीच्या अध्यक्ष डॉ.माधवी जाधवर-तांबडे, सदस्य सविता फटाळे, बिना हिरेकर आणि अँड.ममता नंदनवार यांनी त्या दोघांना व्यवस्थित मार्गदर्शन करुन भविष्यातील जबाबदारी तसेच लहान बाळाच्या संगोपनाची जाणीव करुन दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरिता कुठल्याही गोष्टी ऐकुन घेण्याच्या मानसिकतेत दिसत नव्हती. बाळाचे अनाथ म्हणून संगोपन नको याची तिला कल्पना दिल्यानंतर देखील तिने ऐकले नाही. बाळाच्या वडिलांक डून स्वत:करिता 30 लाख रुपये घेण्याची व ते न दिल्यास कोर्टात जाण्याची तयारी तिने दाखवली. त्यानुसार कौटूंबिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. .........................* तुमच्या भांडणात बाळाचे हाल का? सज्ञान जोडप्यांनी आपल्या भविष्याबद्ल महत्वाचा निर्णय घेताना सुरुवातीला दोघांमध्ये संवाद साधावा. आजकाल तो दुरावताना दिसत आहे. मुलगी सज्ञान व आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यास तिने देखील आपआपसांतील वाद सामंजस्याने मिटविण्याची गरज आहे. यासगळयाचे गंभीर परिणाम मात्र मुलांना सहन करावे लागतात. या प्रकरणात त्या आठ दिवसांच्या बाळाची काय चूक ? असा प्रश्न पडतो.  वाद संपवून सुखात व आनंदाने संसार करण्याकरिता आईवडिल व घरातील ज्येष्ठांचा सल्ला जरुर घ्यावा. वडिलधा-या व्यक्तींनी देखील घरोबा कसा टिकेल यादृष्टीने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.  - अध्यक्ष व सदस्य (बालकल्याण समिती, पुणे ) 

टॅग्स :Puneपुणे