पिंपरी : पोटच्या तीन मुलांना गळफास लावून महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार भोसरी येथे रविवारी (दि. २८) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला. दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदन अहवालातून ही बाब निष्पन्न झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमा अक्रम बागवान (वय २८), फातिमा अक्रम बागवान (वय २८), मुलगी अलफिया अक्रम बागवान (वय ९), झोया अक्रम बागवान (वय ७), मुलगा जिआन अक्रम बागवान (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. यातील अलफिया आणि झोया या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. मुलींवर अत्याचार होत असल्यानेच त्यांची आई फातिमा हिने दोन्ही मुलींना तसेच मुलगा जिआन यालाही गळफास लावून स्वत: आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी फातिमा यांचा पती अक्रम बागवान याला ताब्यात घेतले आहे.
तीन मुलांसह आईची आत्महत्या : पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलींवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 5:19 PM