लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यास तिच्या आईनेच प्रोत्साहन दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खडक पोलिसांनी पीडित मुलीची आई आणि ‘भाईजान’ असे नाव असलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार २०१५ ते २०१६ दरम्यान शिवाजीनगर येथे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईजानने तेथील सार्वजनिक शौचालयातील वरच्या मजल्यावर खोली घेतली होती. त्याने पीडित मुलीच्या घरच्यांशी गोड बाेलून त्यांच्याशी जवळीक वाढविली. घरगुती सामान देण्याचे आमिष दाखवून त्याने या मुलीला खोलीत नेऊन तिच्याशी अनैसगिक कृत्य केले. तसेच तिच्यावर बलात्कार केला. ही बाब तिने आईला सांगितली. तेव्हा आईने तिला मारहाण करत पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्यास भाईजानकडे पाठविले.