या जनसंवादात सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी, लोकायत व विविध संघटनांच्या वतीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरीता गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ व महागाईविरोधात निदर्शने करण्यात आली. महागाईमुळे सर्वसामान्य, नागरिक, नोकरदार, हातावर पोट असणारे, यांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे आणि त्याचा उद्रेक होण्यास सुरुवात झाली आहे त्यानिमित्त निदर्शने करून जनसंवाद साधण्यात आला. या वेळी माजी नगरसेवक विजयराव मोहिते, शशिकला कुंभार, शैलेंद्र ऊर्फ बंडु नलावडे, गणेश मोहिते, शंकर ढवळे, मिलिंद कडभाने, हरिदास अडसुळ, रवी ननावरे, सतीश कांबळे, जावेद शेख, गणेश पाटील, प्रमोद कोठावळे, राजेंद्र पायगुडे, सुरेश शेंडकर, प्रवीण दामजी, संजय ववले, प्राजक्ता जाधव, अभंग संजय, रफिक आळमेळ उपस्थित होते.
जनसंवादाचे समन्वय रमेश सोनकांबळे, नीलेश कुलकर्णी, अभिजित उंद्रे यांनी केले.
................................................................................
फोटो ओळ :- बिबवेवाडी येथे वाढत्या महागाईविरोधात नागरिकांशी जनसंवाद साधत निदर्शने.