वाघोली : येथील परिसरातील बकोरी फाटा ते भावडी रस्त्यासाठी करण्यात येणा-या भूसंपादनासाठी शेतक-यांना पीएमआरडीएकडून बेकायदा नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्या विरोधात शेतक-यांनी सोमवारी औंध येथील पीएमआरडीएच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. जोपर्यंत या नोटिसा मागे घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याची भूमिका या शेतक-यांनी घेतली होती. भूसंपादनास शेतकºयांचा विरोध असून, एक इंचही जमीन देणार नसल्याचे म्हणणे त्यांनी मांडले.‘पीएमआरडीए प्रशासन शेतकºयांमध्ये दहशत निर्माण करत आहे. प्रस्तावित रस्त्यास शेतकºयांचा विरोध आहे. त्यामुळे त्यासाठी भूसंपादन करू नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान पीएमआरडीएकडून नोटिसा रद्द करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर हे आंदोलन थांबविण्यात आले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना पश्मिच महाराष्टÑ अध्यक्ष प्रकाश बालवडकर, राहुल म्हस्के, कमल तांबे, सुशील चौधरी, कौशल्य औटी, महेश वराडे, संतोष दळवी, गणेश सातव, गिरीश शहा, शशिकला लोखंडे, कांचन गवंडर, राजेश गवंडर, अशोक राऊत, अनिल म्हस्के आदी उपस्थित होते.>वाघोली शेतकरी कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या समितीकडून यापूर्वी राजू शेट्टी यांनाही निवेदन दिले आहे. या वेळी शेट्टी यांनीदेखील शेतकºयांना पाठिंबा दिला आहे. शेतकºयांची कोणतीही परवानगी न घेता त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. जमिनी बेकायदा असल्याचे त्यात म्हटले होते. याला शेतकºयांनी जोरदार विरोध केला आहे.
भूसंपादनाच्या विरोधात आंदोलन, वाघोलीतील शेतक-यांचा पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 1:14 AM