पुणो : स्थानिक संस्था कर ( एलबीटी ) रद्द करून महानगरांना मूलभूत सेवा पुरविणा:या स्थानिक स्वराज्य संस्थांचे अस्तित्व धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुणो महापालिका कामगार युनियनने दिला आहे. एलबीटी रद्द करण्याबाबत राज्यपाल
सी. विद्यासागर राव यांनी केलेल्या घोषणोचाही संघटनेने जाहीर निषेध केला आहे. या
निषेधाची पत्रके संघटनेने महापालिका भवनात लावली असून, त्यात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
तत्कालीन आघाडी सरकारने दीड वर्षापूर्वी लागू केलेला एलबीटी रद्द करण्याची मागणी राज्यभरातील व्यापा:यांनी केली होती. व्यापा:यांच्या या मागणीस अनुकूल प्रतिसाद देत, भारतीय जनता पक्षाने लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आल्यास तत्काळ एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, हा कर रद्द करण्याच्या हालचाली शासनाने सुरू केल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी नवीन भाजपा सरकारने बहुमत ठराव जिंकल्यानंतर राज्यपाल राव यांनी केलेल्या अभिभाषणात एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली होती.
या घोषणोचा संघटनेने निषेध केला आहे. या निर्णयामुळे महापालिकेची आर्थिक कोंडी होणार आहे. त्यामुळे एकतर एलबीटी ठेवावा अथवा पुन्हा जकात सुरू करावी अशी संघटनेची भूमिका आहे. (प्रतिनिधी)
नागरी सुविधा धोक्यात येणार
शहर वेगाने वाढत असून, आरोग्य, पाणी, स्वच्छता, अशा अनेक मूलभूत सेवा महापालिका पुरविते. त्यामुळे हा निर्णय घेऊन लाखो नागरिकांचे जीवन व नागरी सुविधा धोक्यात आणू नयेत, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. ही मागणीची पत्रके महापालिका भवनाच्या भिंतींवरही लावण्यात आली आहेत.