लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाची मोठ्या प्रमाणात ये -जा आहे. अशा व्यक्तीकडून स्थानकावर गुन्हे घडत असताना त्याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरची प्रवासी सुरक्षा वाढविण्यात यावी, ह्या प्रमुख मागणीसाठी विभागीय रेल्वे सल्लगार समिती सदस्य निखिल काची यांनी स्थानकाच्या प्रवेशद्वारजवळ आंदोलन केलं. यावेळी त्यांनी मागण्याचे निवेदन स्टेशन डायरेक्टर सुरेश चंद्र जैन यांना देण्यात आले.
पुणे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरांची संख्या अत्यंत तोकडी आहे. ती वाढविण्यात यावी. स्थानकांवर आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, प्रवासी सुरक्षेसंदर्भात पुणे स्थानकाचे सुरक्षा ऑडिट करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशीही मागणी केली असल्याचे काची यांनी सांगितले. यावेळी संदीप बुटाला, राहुल शर्मा, अनिल परदेशी, सुरेश माने आदी मान्यवर उपस्थित होते.