शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

ठेकेदारांसाठी ‘स्वच्छ’चे काम थांबविण्याच्या हालचाली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:09 AM

पुणे : लाखो पुणेकरांच्या घरात, दुकानात तयार होणारा हजारो टन कचरा उचलून शहर स्वच्छ ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ‘स्वच्छ’ ...

पुणे : लाखो पुणेकरांच्या घरात, दुकानात तयार होणारा हजारो टन कचरा उचलून शहर स्वच्छ ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ‘स्वच्छ’ संस्थेचे काम ठेकेदारांसाठी थांबविण्याच्या हालचाली पालिकेत सुरु आहेत. संस्थेमध्ये काम करणाऱ्या हजारो कष्टकरी कचरा वेचकांच्या रोजगाराचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला असून पोटाला चिमटे काढून जगणाऱ्यांच्या तोंडचा घास प्रशासन हिरावून घेणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

पालिका आणि स्वच्छ संस्थेमध्ये २०१६ साली पाच वर्षांचा करार झाला होता. स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांना घरटी कचरा गोळा करण्याचे साधारणपणे ५० रुपये महिन्याकाठी मिळतात. तर, व्यावसायिकांकडून १०० रुपये घेण्यास त्यांना परवानगी दिलेली आहे. या कराराची मुदत नुकतीच संपली असून तीन महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे. ही मुदत संपल्यानंतर ठेकेदार नेमून त्यांच्यामार्फत कचरा गोळा करण्याचा घाट घातला आहे. काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वच्छ संस्थेला काम देण्याऐवजी अन्य कंपन्यांना काम द्यावे अशी भूमिका घेतली आहे.

गेले काही दिवस स्वच्छ संस्थेचे कार्यकर्ते पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सातत्याने भेटी घेऊन आपली भूमिका मांडत आहेत. यासोबतच संस्थेकडून सविस्तर सादरणीकरणही अधिकाऱ्यांपुढे केले आहे.

====

मिळकती : साडे आठ ते नऊ लाख

एकूण कर्मचारी : ३, ५००

पालिकेचा स्वच्छला वार्षिक निधी : अडीच ते साडेतीन कोटी रुपये

====

‘स्वच्छ’ संस्थेचे काम काढण्याबाबत कोणताही निर्णय केलेला नाही. भाजपाचा तसा कोणताही विचार नाही. आमची आणि प्रशासनाची याविषयावर अद्याप चर्चा झालेली नाही. याबाबत सविस्तर माहिती घेऊन विचारपूर्वक योग्य तो निर्णय घेतला जाईल.

- मुरलीधर मोहोळ, महापौर

=====

‘स्वच्छ’सोबत नवीन करार करण्यास विरोध : शिवसेना

‘स्वच्छ’चे कर्मचारी दर महा साडेचार ते पाच कोटी रुपये शुल्कामधून गोळा करतात. वर्षभरात साधारणपणे २५ कोटी आणि पाच वर्षात सव्वाशे कोटी रुपये संस्थेने जमा केले. यासोबतच पाच वर्षात पालिकेने सुपरव्हिजन चार्जेस म्हणून संस्थेला १५ कोटी रुपये दिले आहेत. हे काम करताना अनेक अटी व शर्तींचा भंग करण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी याबाबत तक्रारीही केल्या. नागरिकही तक्रारी करीत आहेत. संस्थेसोबत संपलेला करार पुन्हा नव्याने करु नये. त्याला आमचा विरोध आहे. या कामासाठी जाहीर प्रगटन देऊन विविध संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात यावेत.

- पृथ्वीराज सुतार, गटनेते, शिवसेना