पुणे : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे देशभरात असंतोषाचे आहे. तसेच या प्रकरणामुळे योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर विरोधी पक्षांकडून टीकेची तोफ डागल्या जात आहे. आता हाथरस प्रकरणावरून शिरूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील योगी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
खासदार अमोल कोल्हे हाथरस बलात्कार प्रकरणावर म्हणाले, ' ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा करावा तितका निषेध कमीच आहे. परंतू, उत्तर प्रदेशमध्ये कुणाचे सरकार आहे हे सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने कुणाच्या आड लपत राजकारण करणे थांबवले पाहिजे. तसेच भाजपने ज्या ज्या ठिकाणी त्यांचे सरकार आहे, तिथे सर्व माता भगिनींना सुरक्षित वातावरण कसे मिळेल याची काळजी घेतली ते जास्त योग्य राहील.
उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणाचे देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून विरोधकांनी देखील या प्रकरणावरून योगी सरकार विरोधात चांगलेच रान उठवले आहे. यामध्ये काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियंका गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही या हाथरस प्रकरणावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
..........
हाथरस बलात्कार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया ...
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये तरुणीबाबत जे घडले ते वाईट होते. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरीही अशा घटना घडता नयेत. केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे जेणेकरुन असा प्रकार करणारी विकृती दहा वेळा विचार करेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
अजित पवार म्हणाले, उत्तर प्रदेशमधील योगी सरकार विरोधकांशी वागत असल्याबाबत भाष्य केले. महात्मा गांधी यांचे विचार आजच्या शतकातही प्रगतीचा मार्ग दाखविणारे आहेत, असे पवार म्हणाले. हाथरसमध्ये माणुसकीला काळीमा फासण्य़ात आला. जो प्रकार घडला त्याला शब्द नाहीत. अशा घटना महिलांच्या बाबतीत, मागासवर्गीयांच्या बाबतीत घडत आहेत. काही काळ चर्चा होते आणि जो तो आपापल्या कामाला लागतो. निर्भया घडले, त्यानंतरही अनेक घटना घडल्या. केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे.