शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लसीकरणावरून खासदार-आमदार एकीकडे तर पालिका पदाधिकारी दुसरीकडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 12:02 AM

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना दोन वेगवेगळी पत्रे; राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा 

पुणे : पुणेकरांना सरसकट लसीकरण करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधानांसह केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठविण्यात आली आहेत. पालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठविण्यात आले असून खासदार-आमदारांनी पंतप्रधानांनापत्र पाठविले आहे. एकाच दिवसात दोन वेगवेगळी पत्र 'रवाना' करण्यात आल्याने लोकप्रतिनिधींमध्ये 'एकवाक्यता' नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपमधील अंतर्गत घडामोडी या नेहमीच चर्चेच्या ठरतात. शहरात सध्या लसीकरणाची गडबड सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून १८ वर्षांपुढील प्लसर्व पुणेकरांना सरसकट लस दिली जावी. त्याकरिता आवश्यक असलेल्या ५० लाखांचा लसीकरणाचा खर्च उचलण्यास पालिका तयार असल्याचे बिडकर यांनी नमूद केले आहे. हे पत्र पाठवून २४ तास उलटत नाहीत तोच खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना याच अनुषंगाने पत्र पाठविले आहे.बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रावर आमदार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, डॉ. सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पत्रामध्ये ३० वर्षांपुढील पुणेकरांना लस देण्याची मागणी केली आहे. या दोन्ही पत्रात पुणेकरांना दिलासा देण्यासाठी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन्ही पत्रांमध्ये पुणेकरांच्या 'फायद्या'चीच मागणी करण्यात आली आहे. मात्र, दोन वेगेवगळ्या पत्रांमध्ये पुणेकरांच्या वयाचे दोन वेगवेगळे उल्लेख करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकवाक्यता नाही. तसेच काही दिवसांपूर्वी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही अशाच स्वरूपाची मागणी केलेली होती. त्यातच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही ४५ वर्षांपुढील सर्वानाच लस देणार असल्याचे मंगळवारी दिल्लीतून जाहीर केले. लसीकरणावरून भाजपाच्या पालिका पदाधिकारी, खासदार-आमदार आणि शहर संघटना यांच्यात एकवाक्यता नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका