Maratha Reservation: 9 दिवसांत खूप काही होऊ शकते; संभाजी राजे, मराठा आरक्षणावर अजित पवारांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 06:40 PM2021-05-28T18:40:53+5:302021-05-28T19:13:08+5:30
Maratha Reservation ajit pawar talk: मराठा आरक्षणावरून काहींना त्यात राजकारण करायचे आहे, संभाजी राजेंना नाही....
पुणे : मराठा आरक्षण संदर्भात सगळं सुरळीत चाललेलं आहे. तुम्ही त्याला काही वेगळं वळण देऊ नका. संभाजी राजे यांनी ६ जून पर्यंतची मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्यासंबंधी मुदत दिली आहे.पण या तारखेला अद्यापही ९ दिवस अवकाश आहे. यादरम्यान नक्कीच चांगला निर्णय घेता येईल. मात्र, मराठा आरक्षणावरून काहींना त्यात राजकारणच करायचे आहे, संभाजी राजेंना नाही.अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
पुण्यात अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, माझी आणि संभाजीराजेंची भेट दारातच झाली. आम्ही एकमेकांना फक्त नमस्कार केला. पण राज्य सरकारने मराठा आरक्षणासंबंधी पुढाकार घेवुन दिलीप भोसले जे अलाहाबाद हाय कोर्टाचे चीफ जस्टीस आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ते आता यावर काम करत आहेत.
We have 9 days in hand, many things can be done in this period. We will try everything to find the best way to find a solution: Maharashtra Deputy CM Ajit Pawar pic.twitter.com/l34FucCUzk
— ANI (@ANI) May 28, 2021
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याचा समाचार...
काही कारण नसताना काहीजण म्हणतात, आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. पण कसलं आंदोलन, आणि कशासाठी पाठिंबा? अशा शब्दात अजित पवारांनी
चंद्रकांत पाटलाच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंब्याबाबतच्या वक्तव्याचा समाचार घेतला. परंतू नंतर आता दादांचं ऐकायलाच पाहिजे. कारण मी, राजेश टोपे आम्ही सगळे मराठा समाजातले आहोत, आम्हाला पण आता रस्त्यावर उतरायला पाहिजे असा शाब्दिक टोमणा देखील मारला.
.
खासदार संभाजीराजेंनी दिला 'शिवराज्याभिषेक दिना' चा अल्टिमेटम...
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. "६ जून रोजी शिवाजी महाराज छत्रपती झाले. आज मी घोषणा करतोय. ६ जूनपर्यंत आमच्या पाच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ६ जूनपासून रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु, यावेळी आम्ही कोरोना बिरोना बघणार नाही", असा थेट इशाराच छत्रपती संभाजी राजेंनी दिला आहे.
संभाजी राजे यांनी यावेळी सरकारसमोर पाच महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. "मी मुख्यमंत्र्यांना बोललो, जे तुमच्या हातात आहे, ते तुम्ही करा. मी पाच गोष्टी काढल्या त्या पूर्ण व्हायला हव्यात. आज मराठा समाज माझ्यामुळे शांत आहे", असं संभाजी राजे म्हणाले.