तालुक्यातील आंबवडे भागातील पान्हवळ, करंजे नाझरे, वडतुंबी, टिटेघर गावातील नुकसानीची पाहणी केली. या वेळी स्थानिक शेतकऱ्यांबरोबर संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. पाहणी दौरा झाल्यानंतर टिटेघर येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विक्रम खुटवड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भोर तालुका राष्ट्रवादी काँगेस अध्यक्ष संतोष घोरपडे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, माजी जि.प.सदस्य भिकुआण्णा निगडे, उपसभापती लहुनाना शेलार, भोर शहर राष्ट्रवादी अध्यक्ष नितीन धारणे, तालुका युवक अध्यक्ष गणेश खुटवड, रामदास जेधे, अरविंद जाधव, साधना खोपडे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष मनोज खोपडे, विद्यार्थी तालुका अध्यक्ष केतन चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सुहित जाधव, नितीन कुडले, सरपंच रोहिदास जेधे, संदीप खाटपे, बबन साळेकर, विशाल खोपडे, विविध क्षेत्रातील शासकीय अधिकारी, तसेच भागातील सरपंच, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:12 AM