मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथे सुरु असलेल्या कोविड केअर सेंटरला शिरुर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांनी भेट दिली या वेळी ते बोलत होते. कोल्हे म्हणाले की, राज्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी अधिक मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत असून ही आकडेवारी भयावह आहे. कोरोना नियंत्रणासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु असून तुलनेने सर्वत्र वैद्यकीय मदत अपुरी पडत आहे.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार म्हणाले की, अनेक नागरिक रेमडेसिविर इंजेक्शनसाठी आग्रह धरतात परंतु कमी इन्फेक्शन असणाऱ्या नागरिकांनीही वैद्यकीय सल्ला घेऊनच आवश्यकता असेल तरच रेमडेसिविरचा वापर करावा .
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, तहसीलदार लैला शेख, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दादा पाटील-फराटे, संभाजी फराटे, तालुका आरोग्य अधिकारी मोरे, आदी यावेळी उपस्थित होते.