पुणे – अवघ्या काही दिवसांवर आलेली MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे, मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, पुण्यात हजारो विद्यार्थी सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत, MPSC परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती, मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता सरकारने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.( BJP Oppose Thackeray Government decision of MPSC Exam Postponed)
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला, यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर(BJP MLC Gopichand Padalkar) यांनीही विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून ठाकरे सरकारच्या निर्णयाचा विरोध केला. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, सरकारने आतापर्यंत पाच वेळा MPSC परीक्षा पुढे ढकलल्या,?'[=
आता पुन्हा परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलल्या, सरकारचं धोरण चुकीचं आहे, जोपर्यंत सरकार MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करतंय, UPSC परीक्षा झाल्या, बँकिंग परीक्षा झाल्या, मग MPSC परीक्षांसाठी कोरोना होतो का? MPSC परीक्षा न घेण्यामागे ठाकरे सरकारचं राजकारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच १ लाख विद्यार्थी MPSC च्या परीक्षेसाठी पुण्यात राहतात, दर महिन्याला ९ ते १० हजार रुपये घराचे भाडे देतात, परंतु सरकारला या विद्यार्थ्यांसाठी काही देणंघेणं नाही. विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, सरकार निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही. पोलिसांनी दादागिरी करू नये असं आवाहनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
काय म्हटलंय परिपत्रकात?
येत्या १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.याबाबतची अधिकृत माहिती एमपीएससीने परिपत्रकाद्वारे दिली आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील पत्रकात म्हटले आहे. कोरोना संकटामुळे मागील वर्षभरात जीवनमान विस्कळीत झाले आहे. तसेच याचा परिणाम शैक्षणिक पातळीवर पण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. तसेच एमपीएससीच्या उमेदवारांना देखील याचा चांगलाच फटका बसला आहे. मात्र, १४ तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांची परीक्षेसाठीची प्रतिक्षा कायम राहिली आहे.
पहिल्यांदा २०१९ च्या मार्च महिन्यामध्ये एमपीएससीची पूर्व परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलली होती. त्यानंतर एमपीएससी नेच जाहीर करण्यात आलेली ११ ऑक्टोबर सुद्धा मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे रद्द करण्यात आली. आता १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी ची परीक्षा पुन्हा एकदा पुढे गेल्यामुळे उमेदवारांमध्ये कमालीची नाराजी आहे.