कोरोना प्रादुर्भाव आणि इतर कारणांमुळे गेल्या वर्षी वारंवार विविध स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि भविष्यावर झाला. सध्या विद्यार्थ्यांची मानिसक स्थिती खालावली आहे. त्यामुळे आता या परीक्षेबाबत तयारी करतांना परीक्षा नियोजित वेळेत होईल,अशी आशा ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे. आता कोणत्या ही कारणास्तव या परीक्षा पूढे ढकलण्यात आल्या तर विद्यार्थ्यांवर याचा दीर्घकालीन परिणाम होईल. सध्या राज्यात गेल्या महिन्या भरात अनेक कार्यक्रम होत आहेत. अलिकडच्या काळात इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षा, पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणूक होणार आहेत. त्यामुळे आवश्यक खबरदारी घेऊन परीक्षा घ्याव्यात. कोरोना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी विशेष बसची सोय करण्यात यावी, असे या निवेदनात नमूद केले आहे.
एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा नियोजित वेळेत घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:12 AM