शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

‘एमपीएससी’ म्हणजे घोळात घोळच, निकाल रखडले, परीक्षा लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 2:21 AM

मनस्तापाची परंपरा : निकाल रखडले, परीक्षा लांबणीवर

अमोल अवचितेलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तारीख बदलल्याने गुरुवारी राज्यभरचे विद्यार्थी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले. मात्र, परीक्षा वेळेत न घेणे, निकाल रखडवणे या प्रकारातून विद्यार्थ्यांना मनस्ताप देण्याची एमपीएससीची परंपराच असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. नियुक्त्या प्रलंबित राहण्याचीही टांगती तलवार असते, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.  

एमपीएससीने २०१८ आणि २०१९ रोजी घेतलेल्या परीक्षांबाबत गंभीर होण्याची गरज आहे. आरक्षण तसेच न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या परीक्षा सोडून इतर परीक्षांचे तरी निकाल लावावेत. जेणेकरून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा नियुक्तीचा प्रश्न सुटेल. रखडलेल्या मुलाखती पार पडतील, अशी विनंती विद्यार्थी करतात. एमपीएससीने राज्यसेवा २०१९  परीक्षा ४२० पदांसाठी घेतली. या परीक्षेची जाहिरात १० डिसेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध केली. पूर्वपरीक्षा १७ फेब्रुवारी, तर मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै २०१९ रोजी घेण्यात आली. अंतिम निकाल १९ जून २०२० रोजी लावण्यात आला. एकूण ४२० पदांपैकी ४१३ उमेदवार निवडण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेला दीड वर्षाचा कालवधी होऊन गेला आहे. शासन नियमानुसार तीन महिन्यांत नियुक्ती देणे बंधनकारक आहे. मात्र, राज्य सरकार मराठा आरक्षणाचे कारण पुढे करत नियुक्ती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

‘एमपीएससी’चे रडगाणेएक अध्यक्ष आणि एका सदस्यावर कारभार सुरू आहे. रिक्त असलेली चार सदस्य संख्या पूर्ण भरली गेली तर  एमपीएससीला पूर्ण क्षमेतेने काम करता येईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. रिक्त सदस्यांची पदे न भरल्याने केवळ दोन सदस्यांना मुलाखती घ्याव्या लागत आहेत.

 ३८७ उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेतn२०१८ पीएसआय - ३८७ उमेदवारांची निवड झाली. अजून ते प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत. nस्थापत्य अभियांत्रिकी २४ नोव्हेंबर २०१९ रोजी सुमारे ११६१ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. निकाल जुलै २०२० मध्ये लावण्यात आला. मात्र, मुलाखती रखडलेल्या आहेत. nयाच परीक्षेचा अंतिम निकाल लागला नसतानाही आता २७ मार्च रोजी २०२० ची २१७ पदांसाठी पूर्वपरीक्षा होणार आहे. त्यामुळे आधीच्या परीक्षांची प्रक्रिया पूर्ण न होताच नव्याने परीक्षा घेतली जात आहे.

उत्तीर्ण होऊनही रखडल्या नियुक्त्या स्थापत्य अभियांत्रिकी - ३६७१पोलीस उपनिरीक्षक - २१२७ पशुधन विकास अधिकारी - १३०० (निकाल घोषित होणे आहे.) 

निकाल लागूनही प्रतीक्षा : संयुक्त पूर्वपरीक्षा गट  ब २०१९ ची ५५५ पदांसाठी घेण्यात आली. मार्च २०२० मध्ये निकाल लागला. मात्र, अजून अंतिम निकाल लागलेला नाही. यात पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी ४६९ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षेचा निकाल मार्च २०२० मध्ये जाहीर झाला. मात्र, १५ महिने होऊनही शारीरिक चाचणीसाठी बोलावले नाही. 

n९ सप्टेंबर २०२० सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एसईबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. या निर्णयाने ४१३ पैकी एसईबीसी आरक्षणाचा लाभ घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीवर स्थगिती आली; परंतु ४८ विद्यार्थ्यांमुळे इतर संवर्गातील ३६५ विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या कोणतेही कारण न देता रखडवल्या आहेत.

n९ डिसेंबर २०२० रोजी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने मराठा आरक्षण कायद्याअंतर्गत येणाऱ्या नियुक्त्या वगळून इतर नियुक्त्या देण्यास राज्य सरकारला रोखलेले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे एसईबीसीव्यतिरिक्त इतर उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाPuneपुणे