पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सहायक (मुख्य) परीक्षा २०१५ चा अंतिम निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. परीक्षेत कोल्हापूर येथील अजिंक्य आजगेकर हा राज्यात प्रथम आला आहे, तर ठाण्यातील विकास प्रकाश बिक्कड हा मागासवर्गीयांमधून प्रथम आला. तसेच महिलांमधून लातूरची स्वाती सोमवंशी राज्यात प्रथम आली आहे.आयोगातर्फे ८ नोव्हेंबर २०१५ रोजी सहायक पदासाठी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या एकूण ९६ पदांचा निकाल शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. त्यात खुल्या प्रवर्गातील २० उमेदवारांचा, १७ महिला व १० एस. सी. संवर्गातील उमेदवारांचा, ओबीसी संवर्गातील ११ उमेदवारांसह इतरही संवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. खुल्या वर्गातून अजिंक्य आजगेकर, मागासवर्गीयांतून विकास बिक्कड आणि महिला गटातून स्वाती सोमवंशी यांनी राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. अंतिम निकालात अर्हता प्राप्त न झालेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास संबंधित उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्यापासून १० दिवसांत आयोगाकडे आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावा, असे आयोगाचे उपसचिव विजया पडते यांनी स्पष्ट केले आहे.
एमपीएससीचा निकाल जाहीर
By admin | Published: January 31, 2016 4:32 AM