Black fungus treatment cost: कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत चालली आहे. अनेकांना कोरोना उपचारानंतर ब्लॅक फंगसचा (Black fungus) सामना करावा लागला आहे. य़ा म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) रुग्णांची संख्या देशभरात वाढत आहे. या रुग्णांनी लक्षणे कशी ओळखावीत हे एम्सने सांगितले आहे. मात्र, याचे उपचारही कोरोनासारखेच महागडे आणि औषध टंचाईचे आहेत. यामुळे पुण्याच्या डॉक्टरांनी ब्लॅक फंगसवरील उपचार पद्धतीचा कमी खर्चाचा पर्याय सुचविला आहे. (Black fungus treatment cost can 100 times cheaper with blood creatinine test.)
ब्लॅक फंगससाठी अँटी फंगल इंजेक्शनचा तुटवडा आहे. कोरोना नंतर ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रुग्णांचा एका दिवसाचा खर्च हा जवळपास 35000 रुपये आहे. जो 100 पटींनी कमी होऊन 350 रुपये एवढाच होऊ शकतो. डॉक्टरांनी ब्लॅक फंगसवर उपचाराचा एक पर्याय सुचविला आहे. यामध्ये सावधानतेने रुग्णाच्या रक्तातील क्रिएटिनिन लेव्हलवर लक्ष ठेवावे लागणार आहे. यामुळे उपचाराचा खर्च कमी होणार आहे. (shortage of black fungus injection.)
ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी वापरले जाणारे इंजेक्शन हे एम्फोटेरेसिन आहे. रेमडेसीवीर सारखीच या इंजेक्शनची देखील टंचाई आहे. इंजेक्शनची किंमत जास्त आहेच, परंतू ते सहज मिळत नाहीय. यामुळे दुसरे उपचार पद्धती वापरून यावरील खर्च खूपच कमी केला जाऊ शकतो. यासाठी दर दुसऱ्या दिवशी रुग्णाची रक्त चाचणी करावी लागणार आहे.
पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजचे ENT हेड समीर जोशी यांनी सांगितले की, कोरोना नंतर ब्लॅक फंगसच्या 201 रुग्णांवर उपचार केले आहेत. यापैकी 85 टक्के रुग्ण हे conventional amphotericin आणि सर्जरी केल्यानंतर बरे झाले आहेत. कोरोनाच्या आधी याच पद्धतीने ब्लॅक फंगसचे 65 पैकी 63 रुग्ण बरे झाले आहेत. सर्जरीमध्ये मृत पेशी काढून टाकल्या जातात. दुसरे ENT सर्जन संदीप कर्माकर यांनी सांगितले की, conventional आणि Liposomal amphotericin उपलब्ध होत नाहीय. conventional चा खर्चही कमी आहे.