वास्तुशास्त्रात दिशा आणि स्थान यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. इमारत, बंगला यांच्या वास्तूचा विचार करण्यापेक्षा प्लॉटच्या वास्तूचा बांधकाम करण्यापूर्वी विचार केला तर सर्वच प्रश्न सुटतील.
- मुकेश गाडा, बांधकाम व्यावसायिक.
आपले घर आनंदी आणि सुखसंपन्न असावे असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी काही वास्तुशास्त्रातील टिप्स उपयोगी ठरतील. इमारत, बंगला बांधताना प्लॉटचा विचार महत्त्वाचा आहे. प्लॉटचा आकार चौकोनी किंवा फार तर आयताकार असावा. असा प्लॉट वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे योग्य ठरतो आणि त्यातील बांधकाम हे आपोआपच वास्तुशास्त्राच्या नियमांप्रमाणे होते. जर तो नसेल तर काय? यालाही उत्तर आहे, काळजी करू नका. प्लॉटची रचना चौकोनी किंवा आयताकार करून घ्यावी आणि उर्वरित जागेत आठही दिशांच्या नियमांप्रमाणे परिसर अनुकूल करून घेतला तर सर्वच प्रश्न सुटतील.
दिशेनुसार तेथे ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?काय हवे ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?काय नको ?
बंगला असेल तर दक्षिण दिशेला रस्ता नसावा. पण, त्याचा परीघ हा आपल्याला अनुकूल करून घेता येईल. ईशान्य ही देवाची दिशा मानली जाते. तसेच तेथे तुम्ही पाण्याचे साठे करू शकता. जसे पाण्याच्या टाक्या. आग्नेय दिशा अग्निजन्य वस्तूसाठी योग्य आहे. तेथे तुम्ही स्कीमसाठी लागणारा ट्रान्सफॉर्मर उभारू शकता. आग्नेय आणि नैर्ऋत्यकडे प्रवेशद्वार ठेवू नये. ते दक्षिण दिशेच्या मध्यातून असेल तर चालेल. नैर्ऋत्य दिशा ही लक्ष्मीची मानली जाते. तेथे तुम्ही तिजोरी किंवा अवजड वस्तू ठेवून तो भाग जड करून ठेवावा. तेथे प्रवेशद्वार नसावे. येथे मोठी कमान असावी. तसेच हा भाग प्लॉटच्या तुलनेत अधिक उंच ठेवावा.
घरातील देवघर प्रामुख्याने कुठे असावे, हा प्रश्न विचारला जातो. देवघराची जागा ईशान्य हवी. पण, देवघर तुम्ही कोठेही आणि स्वच्छ जागेत उभारू शकता. पण, शक्यतो ते स्वयंपाकघरात नको.
ईशान्येला पाणीसाठा, देवघर, वायव्येला कचरा, कामगारांची खोली, आग्नेयला स्वयंपाकघर, नैर्ऋत्येला बेडरूम असावी.
दक्षिण, पूर्व, पश्चिमेला डोके करून झोपा
घरात कोणत्या दिशेला डोके केल्यावर शांत झोप लागते? दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेला डोके करून झोपावे. उत्तरेकडे डोके करून झोपू नये. आता ही बाब शास्त्रीयदृष्ट्या स्पष्ट झाली आहे. तसे केल्यास मन अस्वस्थ होते आणि शांत झोप लागते? नाही.
photo on jmedit