लोणी काळभोर : रसायनयुक्त व सांडपाणी सोडल्यामुळे पुण्यातून येणारे मुळा मुठा नदी प्रदुषित झाली आहे. तीला गटार गंगेचे स्वरूप आले आहे. नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने फेसाळलेले आहे. त्यामुळे नदीतील जलतराणाही धोका निर्माण झालेले आहे.४पावसाळ्यात पावसाचे व खडकवासला धरणांतून जादा झालेले पाणी सोडल्याने जलपर्णींसह सर्व घाण बाजूला भिरकावून देऊन वाहिलेली मुळा-मुठा नदी आज पुन्हा कचरा, मलजल व रसायनांच्या गराड्यात सापडली आहे. तिला पुन्हा गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे ही काळ्या पाण्याची शिक्षा आम्ही अजून किती दिवस भोगायची? असा प्रश्न नदीतीरावरील ग्रामस्थांनी केला आहे. ४खडकवासला धरणातून पावसाळ्यात अतिरिक्त झालेले पाणी वगळता एक थेंबदेखील पाणी नदीपात्रात सोडले जात नाही. नेमक्या याच स्थितीचा फायदा घेऊन वर्षातील सुमारे आठ महिने सांडपाणी, मलजल व कारखान्यातून बाहेर पडणारे रसायनयुक्त पाणी महापालिका नदीपात्रात सोडून देते. याचबरोबर हजारो टन कचराही येथेच टाकला जातो. ४हे पाणी दौंड, बारामती आणि उजनीचे पाणी थेट सोलापूरपर्यंत जात असल्याने नदीकाठच्या गावांना सक्तीने रसायनयुक्त दूषित पाणी प्यावे लागते. नाइलाजाने किडनीस्टोन (मुतखडा)व इतर अनेक पोटांच्या आजारांना त्यांना सामोरे जावे लागते. आहे. याचबरोबर शेतीला दूषित पाणी मिळत असल्याने उत्पादनावरही परिणाम होत आहे.जलचरांना धोकाजलचराना जिवंत राहण्यासाठी पाण्यात आॅक्सिजन विरघळणे गरजेचे असते. परंतु, मुळा-मुठा नदीच्या पाण्यात आॅक्सिजनच शिल्लक नाही. डिझॉल्व्हड आॅक्सिजन (डिओ) चे प्रमाण प्रतिलिटर दोन मिलिग्रॅमपेक्षा कमी असणे गरजेचे असते. परंतु, बहुतांशी ठिकाणी याचे प्रमाण अधिक असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. परिणामी, सुमारे ७३ प्रकारचे मासे नामशेष झाले असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे.
मुळा-मुठा पुन्हा ‘फेसाळ’ली
By admin | Published: January 05, 2015 11:15 PM