शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

पुणे  शहरातील रखडलेल्या ‘जायका’ प्रकल्पाला गती देणार  : प्रकाश जावडेकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 8:29 PM

मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धीकरण प्रकल्पाला प्रचंड विलंब

ठळक मुद्देकेंद्र आणि राज्य शासनासोबत लवकरच बैठक‘मेट्रो’च्या दोन मार्ग मार्च २०२० अखेर पर्यंत सुरु करणार 

पुणे : शहरातील मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धीकरण प्रकल्पाला प्रचंड विलंब झाला आहे. केंद्रांच्या पर्यावरण मंत्रालयाचा पदभार पुन्हा आपल्याकडे आल्याने आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी पुढाकार घेणार आहे. यासाठी लवकरच केंद्र आणि राज्य शासनाच्या स्तरावर बैठक लावण्यात येईल, असे स्पष्टीकरण केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे केले.     जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण सभा (दिशा) समितीची बैठक शुक्रवार (दि.१४) रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यानंतर आयोजित पत्रकार परीषदेत जावडेकर यांनी जायका प्रकल्पासंदर्भात माहिती दिली. देश, राज्यातील बहुतेक सर्वच नद्या प्रदूषित झाल्या आहेत. वाढत्या शहरीकरणात ७० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात मैलापाणी थेट नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. यावर उपाय करण्यासाठी व नद्यांच्या शुध्दीकरणासाठी केंद्र शासन लवकरच एक गंभीर पाऊल उचलणार असल्याचे सूतोवाच जावडेकर यांनी केले. दरम्यान, मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धिकरणासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीच्या (जायका) सहकार्याने प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्प मंजूर होऊन चार-पाच वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्याप प्रकल्पाचे काम सुरु झाले नसल्याचे निदर्शनास आणल्यावर या प्रकल्पाला देखील आता गती देणार असल्याचे  स्पष्ट केले. ------------------------‘मेट्रो’च्या दोन मार्ग मार्च २०२० अखेर पर्यंत सुरु करणार  पुणे मेट्रोचे काम जोमाने सुरु आहे.यामध्ये वनाज ते कर्वेरोड आणि संत तुकाराम नगर ते बोपोडी या दोन्ही मार्गावर पहिल्या टप्प्यात १२ किलो मिटरचे काम पूर्ण होत आले असून, येत्या मार्च २०२० अखेर पर्यंत मेट्रो प्रत्यक्षात सुरु करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे स्पष्ट केले. दरम्यान सध्या काम सुरु असलेल्या तिन्ही मेट्रो मार्ग २०२२ अखेर पर्यंत सुरु होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तर शहरामध्ये अन्य भागांमध्ये देखील मेट्रो सुरु करण्याची मागणी येत असून, मागणीनुसार मार्गांचे मास्टर प्लॅन तयार करण्यात येतील. 

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाPrakash Javadekarप्रकाश जावडेकरriverनदीenvironmentपर्यावरण