घोटवडे : मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी निधीची कमतरत भासू दिली जाणार नाही. होणारी विकासकामे ही दर्जेदार व्हावीत यासाठी नवनियुक्त सरपंच-उपसरपंचांनी प्रयत्न करावे असे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
मुळशी तालुक्यातील नवनियुक्त सरपंच-उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी मुळशी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार करत त्यांना पुढील विकासासाठी शुभेच्छा दिल्या. सरपंच स्वाती भेगडे, उपसरपंच भीमाजी केसवड, सदस्य राजाराम शेळके, भाग्यश्री देवकर, वैशाली कुंभार, सारिका खाणेकर यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी सदस्यांनी धुमाळ देवकर वाडी रस्त्यावर दिलेल्या निधीचे काम लवकर सुरू करण्याबाबत विनंती पत्र दिले. यावेळी प्रकाश भेगडे, पंढरीनाथ गोडाबे, बाजीराव धुमाळ, संदीप खाणेकर, संतोष गोडाबे, प्रभाकर भेगडे, बाळासाहेब खाणेकर, शिवाजी देवकर, संदीप कुंभार, यशवंत देवकर, बाळासाहेब भेगडे उपस्थित होते.