टाटांच्या धरणातील अतिरिक्त दोन टीएमसी पाणीसाठ्याचा मुळशीकरांना मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 08:20 PM2020-09-25T20:20:04+5:302020-09-25T20:21:32+5:30

जलसंपदा विभागाच्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

Mulshikar will get additional water reserves from Tata Dam | टाटांच्या धरणातील अतिरिक्त दोन टीएमसी पाणीसाठ्याचा मुळशीकरांना मिळणार लाभ

टाटांच्या धरणातील अतिरिक्त दोन टीएमसी पाणीसाठ्याचा मुळशीकरांना मिळणार लाभ

Next
ठळक मुद्देपुण्यातील विधानभवन सभागृहात बैठक

पुणे :  टाटांच्या मुळशी धरणाची उंची वाढवल्यानंतर साठणारे अतिरिक्त सुमारे दोन टीएमसी पाणी मुळशी तालुक्यातील शेतकरी आणि वाढत्या नागरीकरणाच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी (दि.25) रोजी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय जलसंपदा विभागाच्या जिल्ह्यातील इतरही प्रलंबित कामांचा आढावा घेऊन तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देखील त्यांनी संबंधित अधिकारी यांना दिले. 

पुण्यातील विधानभवन सभागृहात झालेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त सचिव अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष            रणजीत शिवतरे , तसेच पाटबंधारे व  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, नीरा डावा कालव्यावरील वितरण प्रणालीचे विशेष दुरुस्ती प्रस्ताव तसेच शेटफळ तलाव धरण व कालव्याच्या कामाचे प्रस्ताव निधीसाठी राज्य शासनाकडे सादर करावेत. नीरा डावा मुख्य कालव्यातून होणारी पाणीगळती थांबविण्यासाठी या कालव्याच्या अस्तरीकरण व दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव तातडीने सादर करा. नीरा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या जीर्ण झालेल्या दगडी बांधकामांचे काँक्रेटीकरण करुन बांधकामे मजबूत करावीत, असे सांगून इंदापूर तालुक्यातील जुन्या शासकीय इमारती, कार्यालये व विश्रांतीगृहाच्या इमारतीच्या दुरुस्तीची कामेही हाती घ्यावीत, अशा सूचना करुन मुळशी धरण प्रकल्पातून नागरिकांना शेती, आणि पिण्यासाठी दोन टीएमसी वाढीव पाणी मिळण्यासाठी तसेच कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी उपसा योजना राबविण्यासाठी सुर्वे समितीने लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
              भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळवून देण्यासाठी अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावेत. भागाचे सेवानिवृत्त सचिव अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी पाटबंधारे विभागातील कामांच्या प्रश्नांबाबत तसेच विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली.

Web Title: Mulshikar will get additional water reserves from Tata Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.