पुणे : महामेट्रोच्यावतीनेस्वारगेट येथे विकसित करण्यात येत असलेल्या मल्टी मोडल हब च्या जागेमध्ये आढळून आलेल्या भुयारामुळे मूळ आरेखनामध्ये (प्लॅन) बदल करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भुयारांचे नेमके करायचे काय असा प्रश्न मेट्रोच्या अधिकाऱ्यांपुढे आहे. स्थानकाच्या कामामध्ये या भुयाराचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वारगेट येथील अधिकाऱ्यांनी महामेट्रोकडून अभिप्राय मागविला आहे. स्वारगेट येथे मल्टी मोडल हबच्या कामादरम्यान पायलिंग मशीनच्या सहाय्याने खड्डे घेत असतानाच राजर्षी शाहू महाराज बस स्थानकालगतच्या बाजूची जमीन खचली. गोल खड्डा पडलेल्या जागेमधील माती बाजूला करुन खाली उतरुन पाहिले असता जमिनीखाली भुयार असल्याचे आढळून आले. बुधवारी दुपारी आढळून आलेल्या भुयाराची माहिती गुरुवारपर्यंत बाहेर आलेली नव्हती. याबाबत मेट्रोकडूनही वाच्यता करण्यात आलेली नव्हती. ही माहिती हाती लागताच ‘ लोकमत ’ ने भुयार सापडल्याची सविस्तर बातमी दिली.महामेट्रोने यासंदर्भात महापालिकेला पत्र दिले आहे. भुयारातील दगडी भिंतींचे बांधकाम नेमके कसले आहे आणि ते केव्हा करण्यात आले याबाबतची माहिती पालिकेकडे मागितली आहे. तब्बल 55 मीटर लांब आणि दीड मीटर रुंद असलेले एक भुयार आहे. त्याला दक्षिण बाजुने आलेल्या पाईपची जोड आहे. काहीजण हे ऐतिहासिक भुयार असल्याचे मत मांडत आहेत. तर काही जण स्वारगेट येथील जलतरण तलावासाठी या भुयाराद्वारे शेजारील कालव्यामधून पाणी आणण्यात आल्याचे सांगत आहेत. महापालिकेच्या भवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनाही याबाबत फारशी माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मेट्रोच्या पत्राला पालिका काय उत्तर देणार याविषयी उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भुयारांची पाहणी करणे आवश्यक असतानाही दोन्ही विभागाचे अधिकारी याठिकाणी फिरकलेच नसल्याचे मेट्रोच्या सूत्रांनी सांगितले. ====शुक्रवारी सकाळपासूनच याठिकाणी पुणेकरांनी भुयार पाहण्यासाठी गर्दी केली होती. येथील अधिकाऱ्यांनी संभाव्य गर्दी लक्षात घेता जास्तीचे जॅकेट्स आणि हेल्मेट्स आणून ठेवले होते. तरुणांपासून ते 60 वर्षीय आजीबाईंपर्यंत अनेकांना हे भुयार पाहण्याची इच्छा होती. मात्र, छोट्याशा खड्ड्यामधून जवळपास 15 फूट झाली उतरावे लागत असल्याने मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना मनाई केली होती. मात्र, तरीही अनेकांनी केवळ खड्डा पाहूनच समाधान मानले.
‘मल्टी मोडल हब ’च्या प्लॅनमध्ये बदल होणार ? भुयार पाहण्यासाठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 1:14 PM
स्वारगेट येथे मल्टी मोडल हबच्या कामादरम्यान पायलिंग मशीनच्या सहाय्याने खड्डे घेत असतानाच राजर्षी शाहू महाराज बस स्थानकालगतच्या बाजूची जमीन खचली. गोल खड्डा पडलेल्या जागेमधील माती बाजूला करुन खाली उतरुन पाहिले असता जमिनीखाली भुयार असल्याचे आढळून आले.
ठळक मुद्देमेट्रो स्थानकाच्या कामामध्ये ठरु शकतो अडथळापुरातत्व विभाग आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांचे या भुयारांच्या पाहणीकडे दुर्लक्ष