शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

मल्टिप्लेक्समध्ये मनमानीच, प्रेक्षकांमधून नाराजी व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 2:39 AM

एकीकडे मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या अवाजवी दरांबाबत आणि बाहेरील खाद्यपदार्थांना मनाई केल्यामुळे न्यायालयाने फटकारले असले, तरी मल्टिप्लेक्सचालकांची मनमानी अद्याप सुरूच आहे.

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : एकीकडे मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या अवाजवी दरांबाबत आणि बाहेरील खाद्यपदार्थांना मनाई केल्यामुळे न्यायालयाने फटकारले असले, तरी मल्टिप्लेक्सचालकांची मनमानी अद्याप सुरूच आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत शहरातील बहुतांश मल्टिप्लेक्समध्ये नागरिकांना आपल्याजवळील खाद्यपदार्थ थिएटरच्या प्रवेशद्वारापाशी जमा करून आत जावे लागत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या आदेशानंतरही ‘बाहेरील खाद्यपदार्थ आतमध्ये घेऊन जाण्यास मनाई आहे’ असे फलक मल्टिप्लेक्सबाहेर झळकत आहेत. याबाबत प्रेक्षकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.चित्रपटगृहात बाहेरील खाद्यपदार्थ नेणाऱ्या प्रेक्षकाला कुणीही अटकाव करू शकणार नाही, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे व फूड मॉलमध्ये जादा दराने विक्री करणाºया चालकांवर १ आॅगस्टपासून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. विधान परिषदेत या विषयावर लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. चित्रपटगृहात बाहेरून खाद्यपदार्थ नेण्यास मज्जाव करणारा कोणताही कायदा सध्या अस्तित्वात नाही. राज्य सरकारनेही अशासाठी कधी कुणाला अटकाव केला नव्हता, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे. सध्या असे खाद्यपदार्थ नेता येणार नाहीत, ही चालकांनी घातलेली अट शासनाला मान्य नाही. महाराष्ट्र चित्रपट अधिनियम १९६६ मध्येही अशा प्रकारच्या मनाईचा उल्लेख नाही. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहोत. गृह विभाग याबाबत दिशा ठरवत आहे, असेही बापट म्हणाले.या पार्श्वभूमीवर, शहरातील विविध मल्टिप्लेक्समध्ये शुक्रवारी पाहणी करण्यात आली. मोजकी थिएटर वगळता, इतर मल्टिप्लेक्समध्ये अद्यापही बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास मज्जाव केला जात आहे. एका मल्टिप्लेक्समध्ये प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर लावण्यात आला आहे. या डिटेक्टरच्या साह्याने बॅगा आणि ग्राहकांजवळील सामानाची तपासणी केली जाते. या सामानात खाद्यपदार्थ आढळल्यास ते सुरक्षारक्षक काढून घेतात आणि प्रवेशद्वाराजवळील रॅकमध्ये लेबलिंग करून ठेवतात. विशिष्ट क्रमांकाचे लेबल ग्राहकांनाही दिले जाते. सिनेमा पाहून प्रेक्षक बाहेर आल्यानंतर त्यांना डबा अथवा खाद्यपदार्थ परत केले जातात, असे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले.पुणे स्टेशनजवळील एका मल्टिप्लेक्समध्ये पाहणी केली असता, तेथे प्रवेशद्वारापाशी सुरक्षारक्षक बॅग अथवा सामानाची तपासणी करून, खाद्यपदार्थ आढळल्यास काऊंटरला जमा करून घेततात. याबाबत मल्टिप्लेक्सच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे विचारणा केली असता, ‘आमच्याकडे शासनाकडून कोणताही आदेश आलेला नाही,’ असे सांगून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आमच्या मल्टिप्लेक्सचे स्वत:चे वेगळे धोरण असल्याचेही सांगण्यात आले.शासन आदेश आल्यास धोरणात बदलचित्रपटगृहातील स्वच्छता, वातावरण जपण्याच्या दृष्टीने बाहेरील खाद्यपदार्थांना मज्जाव केला जातो.प्रेक्षक एन्जॉयमेंटसाठी मल्टिप्लेक्समध्ये येत असल्याने सहसा येथील खाद्यपदार्थ खरेदी करण्यावरच भर देतात.शासनाकडून काही आदेश आल्यास त्यानुसार धोरणामध्ये बदल करण्यात येईल, असे मल्टिप्लेक्समधील वरिष्ठ अधिकाºयांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.चित्रपटगृहांमधील खाद्यपदार्थांच्या किमती अनेकदा न परवडणाºया असतात. सोबत लहान मुले असतील, तर खाद्यपदार्थ जवळ बाळगणे आवश्यक असते. अशा वेळी तेथील महागडे पदार्थ खरेदी करण्याशिवाय पर्याय नसतो. मल्टिप्लेक्सचालकांची ही मनमानी अन्यायकारक आहे. याबाबत शासनाने कडक कारवाई करायला हवी.- एक प्रेक्षक

टॅग्स :Puneपुणेcinemaसिनेमा