पुणे : पुणे विभागात प्रावीण्यासह प्रथम श्रेणी म्हणजे ७५ टक्क्यांहून अधिक २२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणी ६० टक्क्यांहून अधिक ७२ हजार ६९३ विद्यार्थी तर द्वितिय श्रेणीत ४५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून १ लाख ३ हजार ७२८ जण पास झाले. उत्तीर्ण श्रेणीमध्ये ३५ टक्क्यांहून अधिक २५ हजार ७७६ जणांनी यश मिळविले.
कोकण विभागात प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत ७५ टक्क्यांहून अधिक गुण घेऊन १९०१ जण उत्तीर्ण झाले. तर ६० टक्क्यांहून अधिक गुण ७ हजार ५६३ जणांनी मिळविले. द्वितिय श्रेणीत ४५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून १२ हजार ६६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण श्रेणीत ३५ टक्क्यांहून अधिक गुण २८५७ जणांनी घेतले.
मुंबई विभागात प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत ७५ टक्क्यांहून अधिक गुण ३८ हजार ८८४ जणांनी पटकाविले. तर प्रथम श्रेणी ६० टक्क्यांहून अधिक गुण ७७ हजार ३२२ जणांनी मिळविले. द्वितिय श्रेणीत ४५ टक्क्यांहून अधिक गुण घेऊन १ लाख २६ हजार ७५५ जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण श्रेणीत ३५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे ४७ हजार २९७ विद्यार्थी आहेत.
एकूण विभागात प्राविण्यासह ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे १ लाख ३१ हजार ५६१ विद्यार्थी आहेत. तर प्रथम श्रेणीत राज्यात ४ लाख १२ हजार ३९६ जण उत्तीर्ण झाले. द्वितिय श्रेणीत ४५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे ५८ हजार ७४८ जण आहेत, तर उत्तीर्ण श्रेणीत ३५ टक्क्यांहून अधिक गुण १ लाख ६७ हजार ७६३ जणांनी मिळविले आहेत.